नाग नदीसाठी भारत-जपान कराराचा मार्ग मोकळा

नाग नदीसाठी भारत-जपान कराराचा मार्ग मोकळा

नागपूर : नाग नदी प्रदूषण निर्मूलन शहराचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून आज राजधानी दिल्लीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी "जिका'च्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. नाग नदी प्रदूषण निर्मूलन सर्वेक्षण अहवाल "जिका'ने तयार केला आहे. जपान सरकारच्या मंजुरीनंतर या प्रकल्पासाठी केंद्र सरकार व जपान सरकार यांच्यातील कराराचा मार्ग मोकळा झाला. 
नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाच्या विकास आराखड्यासाठी राष्ट्रीय नदी संरक्षण निदेशालयाकडून 2434 कोटींची मान्यता मिळाली आहे. नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पासाठी जपानची वित्तीय संस्था "जिका' (जापान इंटरनॅशनल कार्पोरेशन एजन्सी) अर्थसाहाय्य करणार आहे. या अर्थसाहाय्यासाठी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये "जिका' आणि मनपामध्ये करार झाला. जानेवारीपासून चार महिने प्रकल्पाच्या नियोजनासंदर्भात "जिका'च्या प्रतिनिधींनी नागपुरात तळ ठोकला होता. एप्रिलमध्ये "जिका'चे शिष्टमंडळ पुन्हा नागपुरात आले होते. चार ते पाच महिने "जिका'च्या प्रतिनिधींनी या प्रकल्पावर नागपुरात काम केले. यावरून नाग नदी प्रदूषण निर्मूलनाबाबत अहवाल तयार करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर आज "जिका'च्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी केंद्र, राज्य सरकारमधील अधिकाऱ्यांसह मनपा आयुक्त अभिजित बांगर उपस्थित होते. यावेळी हा प्रकल्प राबविण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री गडकरी व जिका प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाचा प्रस्ताव एनआरसीडी यांच्याकडे उद्याच पाठविण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बैठकीत दिले. प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचा अहवाल जिकाचे प्रतिनिधींनी जपान सरकारला सादर केला. जपान सरकारच्या मंजुरीनंतर केंद्र शासन व जपान सरकार यांच्यामध्ये प्रकल्प राबविण्यासंदर्भात करार होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत लवकरच केंद्र सरकार व जपान सरकार यांच्यात करार होण्याचा मार्ग मोकळा झाला. साडेबाराशे कोटींच्या या प्रकल्पाची वाढीव किंमत 2434 कोटी आहे, असे आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले. 

प्रकल्पाची किंमत ः 2434 कोटी 
केंद्र सरकार देणार ः 60 टक्के 
राज्य सरकार देणार ः 25 टक्के 
महानगरपालिका देणार ः 15 टक्के 

असा आहे आराखडा 
नाग नदी सौंदर्यीकरणापूर्वी प्रदूषण निर्मूलन 
17 किमी किनाऱ्यावर आठ ठिकाणी आकर्षक उद्यान 
किनाऱ्याजवळील मेट्रो स्टेशन परिसरात मेट्रो करणार सौंदर्यीकरण 
किनाऱ्यावरील 50 हेक्‍टर जागेचा कायापालट 
किनाऱ्याला दोन्ही बाजूने 15 मीटरपर्यंत गर्द हिरवाई 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com