election news in gondpimpri chandrapur district
election news in gondpimpri chandrapur district

विरोधकासोबत दर्शनासाठी गेलेल्या नगरसेविकांची मुले सत्ताधाऱ्यांसोबत रवाना

गोंडपिपरी(चंद्रपूर) - सत्तावीस जुलै रोजी होऊ घातलेल्या नगराध्यक्षाच्या निवडणूकीकरिता लढाई अंतीम टप्यात रंगतदार होत आहे. काँग्रेस, सेना युतीने भाजपकडील पाच अपक्षांना आपल्याकडे खेचले. अाणि बहुमताचा आकडा पार करित या नगरसेवकांना गेल्या पंधरा दिवसापासून दर्शनाला पाठविले. इकडे भाजप गटाने नगराध्यक्ष पदासाठी राकेश पून यांचे नाव जाहिर केले. पूनने नामांकन दाखल केल्यानंतर भाजपने एक मत आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे.

याचाच एक भाग म्हणून विरोधकांसोबत दर्शनासाठी गेलेल्या नगरसेवकांच्या मुलांना आता सत्ताधार्यांनी दर्शनासाठी मनविले आहे. आज नगरसेवकांच्या मुलासह सत्ताधारी गटाकडील मंडळी रवाना झाली. राजुरा विधानसभा क्षेत्रात केवळ गोंडपिपरी नगरपंचायतीवरील सत्तेने आमदार संजय धोटे यांची लाज राखली. आता मात्र काँग्रेस सेना युतीने पाच अपक्षांसोबत सेटींग करित बहुमताचा मॅजीक फीगर जुळविला. अशात विरोधकांचे मनसुबे उधळून नगरपंचायतीवरील सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान भाजपपूढे आहे.

विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. नगरपंचायतीचा निकालाचा परिणाम विधानसभा निवडणुकांवर होणार असल्याची जाणीव आमदार संजय धोटै, माजी आमदार सुभाष धोटे यांना आहे. यामुळेच आपल्या पक्षाकडे सत्तेची चाबी ठेवण्यासाठी भाजप काँग्रेस मध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. बहूमत गाठीत काँग्रेस, सेना व पाच अपक्ष नगरसेवक अज्ञात ठिकाणी दर्शनाला पाठविण्यात आले. त्यांच्याशी सत्ताधारी संपर्क करू शकतात. या भितीने त्यांचे भ्रमणध्वनी नगरातच ठेवण्यात आलेत. गेल्या पंधरा दिवसापासून ते वेगवेगळ्या स्थळी पर्यटनाचा आनंद घेत आहेत. अशात सत्ताधारी गटाकडून आता नगरसेविकांच्या मुलांना मनविण्यात आले. आज सत्ताधारी नगरसेवकांसोबत नगरसेवकांची मुल पर्यटनाचा आनंद घ्यायला रवाना झाली. त्याच्या माध्यमातून तरी विरोधकांसोबत गेलेल्या नगरसेविकांशी संपर्क साधून मत फोडता येतील अशी योजना सत्ताधाऱ्यांनी तयार केली आहे.

27 जुलै रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकरिता रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. नगरपंचायतीवर नेमकी सत्ता कुणाची असेल याच्या रंगतदार चर्चा सूरू आहेत.

गटनेत्याकडून व्हिप....
भाजपने नगरपंचायतीची सत्ता स्थापतांना सहा भाजपचे व सात अपक्ष अशा तेरा नगरसेवकांचा गट स्थापन केला होता.जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत गटाची नोंदणीही करण्यात आली.व चेतनसिंह गौर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. आता अपक्ष नगरसेवक विरोधी गटाकडे वळल्याने गौर यांनी व्हिप जारी केला असून गटातर्फे पून यांना मतदान करण्याचे सांगण्यात आले आहे.

भाजप व मित्रपक्षांच्या गटाची नोंदणी करण्यात आली होती यामूळे गटनेता या नात्याने आपण व्हिप जारी केला आहे असे चेतनसिंह गौर यांनी स्पष्ट केेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com