Woman Dies of Electric Shock Within 24 Hours of Wedding
esakal
नागभीड : कपडे वाळू टाकण्यासाठी गेलेल्या एका विवाहितेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. १३) टी-पाईंट परिसरात घडली. या घटनेने लग्नकार्य सुरू असलेल्या घरात एकच शोककळा पसरली आहे. मृत महिलेचे नाव स्नेहा विशाल वरभे (वय ३८, रा. भद्रावती) असे असून त्या मूळच्या भद्रावती येथील रहिवासी होत्या.