दस्तावेज नष्ट करण्यासाठी ‘श्रेडर मशीन’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

कुटुंब न्यायालयात वापर सुरू, पॅकेजिंगसाठी होणार वापर
नागपूर - नागपूर कुटुंब न्यायालयाने निरुपयोगी कागदाचा उपयोग व्हावा, या उद्देशाने ‘श्रेडर मशीन’ बसविले आहे. निरुपयोगी झालेल्या; परंतु अनेक वर्षांपासून जागा व्यापून असलेल्या कागदांचा वापर आता पॅकेजिंग साहित्य म्हणून होणार आहे.

कुटुंब न्यायालयात वापर सुरू, पॅकेजिंगसाठी होणार वापर
नागपूर - नागपूर कुटुंब न्यायालयाने निरुपयोगी कागदाचा उपयोग व्हावा, या उद्देशाने ‘श्रेडर मशीन’ बसविले आहे. निरुपयोगी झालेल्या; परंतु अनेक वर्षांपासून जागा व्यापून असलेल्या कागदांचा वापर आता पॅकेजिंग साहित्य म्हणून होणार आहे.

वैविध्यपूर्ण उपक्रमांमुळे कायमच चर्चेत राहणाऱ्या कुटुंब न्यायालयाने ईका-फ्रेंडली न्यायालयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. ‘पेपरलेस’ न्यायव्यवस्था निर्माण करण्यासाठी काही वर्षांमध्ये ‘ई-कोर्ट’चा वापर सुरू झाला आहे. न्यायव्यवस्था पूर्णत: ऑनलाइन करणे सध्या शक्‍य नाही. परंतु, वर्षानुवर्षे साचलेल्या फाइलींचे करायचे काय, हा प्रश्‍न न्यायालयासह सर्वच शासकीय कार्यालयांना सतावत आहे. यावर उपाय म्हणून निरुपयोगी असलेल्या कागदांची छाननी करून त्याला श्रेडर मशीनच्या साहाय्याने योग्य आकार देऊन पॅकेजिंगसाठी उपयोग करण्याचा पर्याय पुढे आला.

नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत नागपूर कुटुंब न्यायालयाने जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याकडे श्रेडर मशीन बसविण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला ताबडतोब मंजूर करीत कुटुंब न्यायालयाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत केले आहे.

नुकतेच कुटुंब न्यायालयात श्रेडर मशीन बसविले असून, वापर सुरू झाला आहे. या प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विलास डोंगरे, कुटुंब न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश ई. एम. बोहरी, न्या. सुभाष काफरे, न्या. पलक जमादार, न्या. प्रशांत अग्निहोत्री आदी होते.

फायलींचा निपटारा
श्रेडर मशीनमुळे निरुपयोगी फाइल्सचा निपटारा लागणार आहे. प्रत्येक वर्षी हजारो प्रकरणे कुटुंब न्यायालयात येतात. या निमित्ताने तयार होणाऱ्या फाइल्सचा अक्षरश: डोंगर झाला आहे. सध्या प्रकरणांचा ऑनलाइन रेकॉर्ड ठेवण्याची सोयदेखील उपलब्ध झाल्यामुळे निरुपयोगी कागद, फाइल्स यांना ठेवण्यात काहीच अर्थ नसल्याची भावना सरकारी कार्यालयांमध्ये व्यक्त करण्यात येते. श्रेडर मशीन यावर चांगला उपाय असून, पॅकेजिंगसाठी तयार करण्यात येणाऱ्या कागदाच्या विक्रीतून संबंधित प्रतिष्ठानला आर्थिक फायदादेखील होणार आहे.

Web Title: nagpue vidarbha news Shredder machine to destroy document