नागपूर बेस्ट इनोव्हेशन सिटी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

नागपूर - स्वच्छ भारत अभियान राबविणाऱ्या केंद्राच्या नगरविकास विभागाने नागपूरला "बेस्ट इनोव्हेशन अँड बेस्ट प्रॅक्‍टिस सिटी' राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी स्वच्छतेच्या पुरस्कारात नागपूरचा पहिल्या दीडशे शहरांमध्ये समावेशही नव्हता. यंदा पहिल्या सात शहरांमध्ये स्थान पटकावून नागपूरने सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. 

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दरवर्षी केंद्राच्या नगर विभाग विभागातर्फे मूल्यांकन केले जाते. त्यानुसार पुरस्कार जाहीर केले जातात. भारतातील पहिल्या तीन बेस्ट क्‍लिनेस सिटीमध्ये इंदोर, भोपाळ आणि चंदीगडने आपले स्थान कायम ठेवले आहे. नागपूर महापालिकेतर्फे कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जात आहे. अलीकडेच या प्रकल्पाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या मोजक्‍या शहरांमध्ये नागपूरचा समावेश आहे. नागपूरमध्ये घराघरांतून दररोज खासगी कंपनीमार्फत कचऱ्याचे संकलन केले जाते. शहरात कुठेही कचरा साठवून ठेवला जात नाही. तो थेट डंपिंग यार्डमध्ये टाकला जातो. येथे कचऱ्यापासून कांडी कोळशाची निर्मिती केली जाते. अलीकडे ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा केल्या जात आहे. 

शहरातील विविध उपक्रमांची दखल 
नागपूरमधून वाहून जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. जलशुद्धीकरण प्रकल्पात शुद्ध झालेले सुमारे शंभर एमएलडी पाण्याचा वापर कोराडी येते औष्णिक वीजनिर्मितीसाठी केला जात आहे. या माध्यमातून महापालिकेला उत्पन्नही मिळत आहे. सांडपाण्यातून उत्पन्न मिळविणारी नागपूर देशातील पहिली महापालिका आहे. शहर स्वच्छतेसाठी शहरात सुरू असलेल्या उपक्रमांची दखल केंद्राने घेतली आहे. विशेष म्हणजे नागपूर शहर हागणदारीमुक्त झाल्याचा दावाही महापालिकेने केला आहे. 

Web Title: Nagpur Best Innovation City