शहरावर पाणीसंकट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

शहरावर पाणीसंकट  
नागपूर : शहरात 24 बाय सात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मात्र तासभर पाणी मिळाले तरी खूप झाले, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. अपुऱ्या पावसामुळे आधीच पेंचमध्ये मर्यादित पाणीसाठा शिल्लक असताना जलसंपत्ती प्राधिकरणाने शहराच्या पाण्यात 35 दलघमीने कपात केली आहे.

नागपूर शहराला पेंच प्रकल्पातून वर्षाला 190 दलघमी पाणी मिळत होते. जलसंपत्ती प्राधिकरणाने यंदा यात कपात करून 155 दलघमी पाणी आरक्षित ठेवले आहे. मनपासाठी आरक्षित असलेल्या पाण्यात 35 दलघमी पाण्याची कपात केली आहे. यंदा कमी पावसामुळे आरक्षण कमी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. हुडकेश्‍वर आणि नरसाळा या दोन ग्रामपंचायती महापालिकाहद्दीत सामील करण्यात आल्याने पाण्याच्या आरक्षणात वाढ होण्याची अपेक्षा असताना त्यात कपात करण्यात आली आहे. याचा फटका मात्र नागपूरकरांना बसणार आहे. या पाणी कपातीचा परिणामही जाणवायला लागला आहे. मनपाकडून नळाला कमी पाणीपुरवठा होत आहे. शहरातील अनेक भागांत सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास पाणी सोडण्यात येत होते. मात्र आता त्यात कपात करण्यात आल्याची माहिती आहे.
"नवीन स्रोत विकसित करणार'
मध्य प्रदेशातील चौराई धरणात पाणी अडविल्याने तोतलाडोह प्रकल्पातील साठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने पाणी आरक्षणात कपात केली आहे. पाणीटंचाई निर्माण होता कामा नये, यासाठी भूजलचे नवीन स्रोत विकसित करण्यात येईल, विहिरी खुल्या करण्यात येईल, विंधनविहिरी करण्यात येईल, पाण्याची गळती थांबविण्यावर जोर देण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur city Water news