

Nagpur DJ Silent Until November 3 Police Ban Loud Sound During Ganeshotsav Navratri Pola Dahi Handi And Major Festivals
esakal
नागपूर: पुण्यातील गणेशोत्सवातील डीजेच्या दणदणाटाने ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असतानाच नागपूर पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. गुरुवारी (ता.३) रात्रीपासून १ नोव्हेंबरपर्यंत शहरात डीजे, डीजे लावलेली वाहने, बीमलाईट, आणि लेझर बीमलाईटच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घेतला आहे. त्यामुळे आगामी सण-उत्सवांमध्ये ‘आवाजाची ताकद’ दाखविण्याऐवजी सर्वच मंडळांना नियमांचे पालन करावे लागणार आहे.