केरळमध्ये नागपूरच्या डॉक्‍टरांची मदत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

केरळमध्ये नागपूरच्या डॉक्‍टरांची मदत
नागपूर : अतिवृष्टीने केरळमधील सर्वस्व वाहून गेले. जीवन नव्याने उभारणारा कार्यक्रम देशभरातून राबवला जात आहे. खरा धोका आता साथ रोग पसरण्याचा आहे. ही बाब लक्षात घेत नागपुरातून मेडिकल व सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वैद्यकीय पथक मदतीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

केरळमध्ये नागपूरच्या डॉक्‍टरांची मदत
नागपूर : अतिवृष्टीने केरळमधील सर्वस्व वाहून गेले. जीवन नव्याने उभारणारा कार्यक्रम देशभरातून राबवला जात आहे. खरा धोका आता साथ रोग पसरण्याचा आहे. ही बाब लक्षात घेत नागपुरातून मेडिकल व सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वैद्यकीय पथक मदतीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
केरळमध्ये 15 दिवसांपासून पावसाने कहर केला असून, जनजीवन उद्‌ध्वस्त झाले आहे. जीवहानी झाली. पूरग्रस्त केरळमध्ये पावसानंतर विविध साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव पसरण्याची दाट शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेत केरळवासीयांना महाराष्ट्र सरकारने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरच्या मेडिकलसह सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्‍टरांचे पथक पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यात वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मेडिकल, मेयोसह नागपूरच्या आरोग्य सेवा विभागाने औषध वैद्यकशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतीरोग, सर्जन, अस्थिरोग विभागासह बालरोग विभागाच्या तज्ज्ञांसोबत पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांचाही समावेश असणार आहे.
37 जणांची यादी
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सुमारे 37 जणांची नावे राज्य सरकारकडे पाठवण्यात आली आहेत. मंगळवारी मेडिकल, मेयो रुग्णालयातून डॉक्‍टरांसह परिचारिका, पॅरामेडिकल व इतर कर्मचाऱ्यांची नावे सरकारकडे पाठविण्यात येतील. सर्जिकल साहित्य, रक्त व प्रयोगशाळेत आवश्‍यक किट, औषधांसह आवश्‍यक वैद्यकीय सामग्रीसह पथक रवाना होणार आहे.

केरळमधील पूररेषेखाली येणाऱ्या धोकादायक गावांचे सुरक्षित स्थळी पुनर्वसन होत आहे. मात्र, पुनर्वसनात साथ आजार मोठ्या प्रमाणात डोकं वर काढतात. केरळची परिस्थिती लक्षात घेता सरकारने घेतलेला निर्णय अतिशय स्तुत्य आहे. या कार्यात मेडिकलकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल.
- डॉ. अभिमन्यू निसवाडे,
अधिष्ठाता, मेडिकल-सुपर, नागपूर.

पूरग्रस्तांना मदत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वैद्यकीय मदतीसाठी तज्ज्ञ डॉक्‍टरांसह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आदेश येताच पथके केरळला रवाना होईल.
- डॉ. संजय जयस्वाल,
आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर.

Web Title: Nagpur doctor's help in Kerala