नागपूर - वैशालीनगरमध्ये युवा व्यापाऱ्यावर गोळीबार 

अनिल कांबळे
मंगळवार, 22 मे 2018

नागपूर : दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी उत्तर नागपुरातील एका युवा व्यापाऱ्यावर गोळ्या झाडून जखमी केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. कपिल तुराडे (वय 32) व्यापाऱ्याचे नाव आहे. कपिलचा फिश पॉट विक्रीचा व्यवसाय आहे. त्याचे एक वैशालीनगर, तर दुसरे ताजनगर येथे दुकान आहे.

सोमवारी साडेआठ ते नऊच्या सुमारास कपिल दुकान बंद करून दुचाकीने घराकडे निघाला होता. रस्त्यातील एका पुलाजवळ दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी कपिलवर गोळ्या झाडल्या. सुदैवाने गोळी त्याच्या हाताला लागल्याने तो थोडक्‍यात बचावला. घटनेनंतर लगेच तो कमाल चौकातील एका खासगी रुग्णालयात भरती झाला. शिवाय या घटनेची पोलिस नियंत्रण कक्षाला सुचना दिली. 

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पाचपावली व यशोधरा पोलिस ठाण्याचे निरिक्षक पुंडलिक मेश्राम सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. ही घटना वसुली किंवा व्यक्‍तीगत कारणातून झाली असावी, अशी शक्‍यता आहे.

Web Title: Nagpur - Firing on a young trader in Vaishalinagar