चौधरींना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

File photo
File photo

अमरावती : समन्वयित कृषी कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत(केम) विविध उपक्रम, सेवा व वस्तू खरेदीप्रकरणात 6 कोटी 12 लाखांच्या अपहारप्रकरणात गणेश चौधरी यांना आर्थिक गुन्हेशाखेपुढे चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश सोमवारी (ता. पाच) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित देव यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे. जिल्हासत्र न्यायालयाने 23 जुलै रोजी चौधरीचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यापूर्वी त्यांना जिल्हा न्यायालयानेदेखील सुनावणी सुरू असताना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. तेव्हा चौधरींनी न्यायालयाचा आदेश पाळला नाही. त्यांनी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध नागपूर उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. त्यावर सोमवारी (ता. पाच) ऑगस्टला सुनावणी झाली. आर्थिक गुन्हेशाखेच्या वतीने पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले उपस्थित होते. उच्च न्यायालयाने चौधरी यांना ईओडब्ल्यूच्या कार्यालयात 7 ते 9 ऑगस्ट 2019 असे तीन दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चौकशीसाठी हजर राहून तपासात मदत करावी, असे आदेश दिले. चौधरींनी उच्च न्यायालयाचा आदेश जर पाळला नाही, तर त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्या जाऊ शकतो. जामीन अर्जावरील उच्च न्यायालयातील पुढील सुनावणी मंगळवारी 13 ऑगस्ट 2019 रोजी होईल, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com