नागपूरचा अतुल धावणार सहारा वाळवंटात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

नागपूर : नागपूरचा मॅरेथानपटू अतुल चौकसे जगातील सर्वात अवघड मानल्या जाणाऱ्या सहारा वाळवंटात धावणार आहे.

अडीचशे किमी अंतराच्या या स्पर्धेत सहभागी होणारा अतुल हा भारताचा एकमेव धावपटू आहे. ही स्पर्धा सहाराच्या विस्तीर्ण वाळवंटात 8 ते 14 एप्रिलदरम्यान होणार आहे. स्पर्धेत 60 देशातील इक हजारांवर धावपटू सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी अतुल शनिवारी (ता. 31) मुंबईमार्गे मोरोक्‍कोला रवाना होणार आहे. स्पर्धा कठिण असली तरी झालेली जय्यत तयारी लक्षात घेता, आपण ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करू, अशी अपेक्षा अतुलने "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केली.

दंदे फाउंडेशनचे प्रमुख डॉ. पिनाक दंदे व डॉ. सीमा दंदे यांनी शुक्रवारी आयोजित औपचारिक कार्यक्रमात त्याला शुभेच्छा दिल्या.

Web Title: nagpur marathon winner atul chaukase sahara desert