सर्जिकल ब्लेडने निवासी महिला डॉक्‍टरने कापला स्वत:चा गळा

File photo
File photo

नागपूर : मेडिकलच्या कान-नाक-घसा विभागातील महिला निवासी डॉक्‍टरने सर्जिकल ब्लेडने स्वत:चाच गळा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न गुरुवारी (ता.27) केला. सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. अश्विनी राऊत (वय 26) असे डॉक्‍टरचे नाव असून, ती बीड येथील रहिवासी आहे. या घटनेमुळे मेडिकलच्या मार्ड वसतिगृहात खळबळ उडाली. मागील सहा महिन्यांमधील ही दुसरी घटना आहे. मेडिकलमध्ये सेवा देणारे निवासी डॉक्‍टर कोणत्या तणावाखाली सेवा देत आहेत, हेच कळायला मार्ग नाही.
मेडिकलच्या मार्ड वसतिगृहातील खोली क्रमांक 32 मध्ये अश्विनी राहाते. वैद्यकीय शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे. गुरुवारी सकाळी आपल्या खोलीत नऊच्या सुमारास ती कोणाशीतरी मोबाईलवरून संवाद साधत होती. काही वेळाने अचानक स्वतःचा मोबाईल फोन भिंतीवर फेकला. यानंतर काही क्षणात पडल्याचा आवाज झाल्याने खोलीतील मैत्रीण धावत आली. त्यावेळी अश्‍विनी रक्ताच्या थारोळ्यात दिसली. तत्काळ वॉर्डनला तसेच आजूबाजूच्या निवासी डॉक्‍टारांना माहिती दिली. शल्यक्रियेच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या "सर्जिकल ब्लेड'ने स्वत:च्या गळ्यावर अश्‍विनीने चिरा मारला होता. रक्ताने माखलेल्या अश्‍विनीला काही निवासी डॉक्‍टरांनी तातडीने कॅज्युअल्टीमध्ये दाखल केले. तिच्यावर सर्जरी करण्यात आली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. तीन रक्तपिशवी तिला लावण्यात आल्या असून अश्विनी अतिदक्षता विभागात व्हेटिंलेटरवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अश्‍विनी विवाहित असून, तिचे पती सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात बालरोग विभागात कार्यरत आहेत. सध्या तिची प्रकृती नाजूक असून आत्महत्येस कौटुंबिक कलह असल्याची चर्चा असली तरी हे एकप्रकारचे कोडे आहे, हे मात्र नक्की.
आत्महत्येच्या प्रयत्नाची तिसरी घटना
मेडिकलमध्ये शिक्षण घेत असलेल्या भावी डॉक्‍टरांसह निवासी डॉक्‍टरांमध्ये तसेच प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांमध्ये प्रचंड तणाव असतो. 24 तास सेवेसह अभ्यासाचा ताण असतो. दरम्यान, या डॉक्‍टरांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ही तिसरी घटना आहे. यापूर्वी पीएसएम विभागातील एका डॉक्‍टरांच्या छळामुळे झोपेच्या गोळ्यांचे सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर मे महिन्यात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला असलेल्या यशवंत खोब्रागडे या भावी डॉक्‍टरने विष प्राशन केले होते. आता अश्विनीने आत्महत्येचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com