नागपूर मेट्रोच्या ताफ्यात 15 गाड्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

सध्या दर 15 मिनिटांनी वर्धा मार्गावर प्रवासी सेवा सुरू असून, सकाळी 8 ते रात्री साडेआठ वाजतापर्यंत 100 नियमित फेऱ्या होत आहेत. लवकरच आणखी 2 मेट्रो कोच 15 डिसेंबरपर्यंत नागपुरात येणार आहे. तसेच उर्वरित मेट्रो गाड्यादेखील निर्धारित वेळेत नागपुरात येणार आहेत.

नागपूर : महामेट्रोच्या मिहान आणि हिंगणा डेपो येथे अनुक्रमे आठ आणि पाच अशा एकूण 13 मेट्रो कोच आहेत. दोन अतिरिक्त मेट्रो गाड्या लवकरच नागपुरात येणार आहेत. 

प्रवाशांना आधुनिक वाहतूक सुविधा देण्याच्या उद्देशाने शहरात सीबीटीसी प्रणालीने नागपूर मेट्रोचे संचालन होत आहे. मेट्रोच्या प्रवासी फेऱ्यांमध्ये वाढ झाल्याने नियमित संचालनासाठी मेट्रोच्या कोचची संख्यादेखील वाढवण्यात आली आहे. सध्या महा मेट्रोच्या मिहान आणि हिंगणा डेपो येथे अनुक्रमे 8 आणि पाच अशा एकूण तेरा मेट्रो कोच आहेत. 2 अतिरिक्त मेट्रो गाड्या लवकरच नागपुरात येणार आहेत.

सध्या दर 15 मिनिटांनी वर्धा मार्गावर प्रवासी सेवा सुरू असून, सकाळी 8 ते रात्री साडेआठ वाजतापर्यंत 100 नियमित फेऱ्या होत आहेत. लवकरच आणखी 2 मेट्रो कोच 15 डिसेंबरपर्यंत नागपुरात येणार आहे. तसेच उर्वरित मेट्रो गाड्यादेखील निर्धारित वेळेत नागपुरात येणार आहेत.

असे का घडले? - निराशा पदरी पडली अन्‌ युवतीने उचलले हे पाऊल

चीन येथील सीआरसीसी, डालीयन याठिकाणी नागपूर मेट्रोचे कोचेस तयार करण्यात येत असून आधुनिक सुविधेने परिपूर्ण कोच तयार करण्यासाठी वेगवेगळ्या देशातून उपकरणे या ठिकाणी लावण्यात आले आहेत. मेट्रो कोचेस तयार होताच ते समुद्री मार्गाने चेन्नई आणि चेन्नईहून महामार्गाने नागपुरात आणल्या जातात. प्रवाशांना आधुनिक मेट्रोची सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी महामेट्रो कटिबद्ध असून मेट्रो तयार करण्यापासून तर शहरात आणण्यापर्यंत सुरक्षेच्या सर्व मापदंडाचे पालन करून याचे नियोजन करण्यात येते. राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक सेवा बाधित न होऊ देता मेट्रो कोचेस शहरात आणले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur Metro has 15 trains