माजी महापौरांनी नाकारले कॉंग्रेसला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

नागपूर : माजी महापौर किशोर डोरले यांना आज कॉंग्रेसचे उमेदवारीसाठी ए व बी फार्म दिला. मात्र, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे प्रभाग 5 मधून त्यांच्यासह चार जणांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी कॉंग्रेसचा उमेदवारीचा प्रस्ताव फेटाळला. 

नागपूर : माजी महापौर किशोर डोरले यांना आज कॉंग्रेसचे उमेदवारीसाठी ए व बी फार्म दिला. मात्र, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे प्रभाग 5 मधून त्यांच्यासह चार जणांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी कॉंग्रेसचा उमेदवारीचा प्रस्ताव फेटाळला. 

माजी महापौर व नगरसेवक किशोर डोरले यांनी महिनाभरापूर्वी त्यांच्या प्रभागातून त्यांच्या मर्जीतील चार जणांना उमेदवारी देण्याच्या अटीवर कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना त्यांच्या मर्जीतील चार जणांना उमेदवारी देण्याचे आश्‍वासनही कॉंग्रेसने दिले. आज केवळ डोरले यांना उमेदवारीसाठी ए व बी फॉर्म देण्यात आला. मात्र, कॉंग्रेसने आश्‍वासन पाळले नसल्याचे नमूद करीत डोरले यांनी कॉंग्रेसचा प्रस्ताव फेटाळला.

डोरले यांनी कॉंग्रेसने धोका केल्याचा आरोप केला. प्रभाग क्रमांक पाचमधून अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून रंजना गोंडाणे, अनुसूचित जाती प्रवर्गातून गणेश मसराम व महिलांच्या इतर मागास प्रवर्गातून मीनाक्षी ठाकरे व सर्वसाधारण प्रवर्गातून स्वतःसाठी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली होती, असे डोरले यांनी सांगितले. परंतु, कॉंग्रेसने अनुसूचित जमाती प्रवर्गातून रामा उईके, एससी महिला प्रवर्गातून प्रीती सहारे यांना उमेदवारी दिली.

कॉंग्रेसने भ्रमनिरास केल्याने उमेदवारी अर्ज नाकारल्याचे डोरले यांनी नमूद केले. त्यामुळे कॉंग्रेसने आता येथून मंगेश सातपुते यांना डोरलेऐवजी उमेदवारी दिली. परंतु, याच प्रभागातून शंकर देवगडे यांनाही ए व बी फॉर्म दिल्याने एकाच प्रवर्गातून दोन ए व बी फॉर्मचा गोंधळ या प्रभागात दिसून आला. 

Web Title: Nagpur Municipal Corporation election Congress Kishor Dorle