संशयित देवदर्शनाला? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

नागपूर - आराधनानगरातील पवनकर कुटुंबातील पाच जणांच्या हत्याकांड घटनेतील संशयित विवेक पालटकरशी संपर्कात असलेल्या जवळपास २०० जणांची पोलिसांनी कसून चौकशी केली. मात्र पोलिसांच्या हाती कोणताही धागा सापडला नाही. आरोपी वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेल्याची चर्चा असून त्या दिशेनेही तपास सुरू केल्याची माहिती आहे.

यापूर्वी विवेकने पत्नीचा खून केल्यानंतर वैष्णोदेवी व गंगादर्शनासाठी गेला होता. त्यामुळे तो आताही कुठल्यातही देवदर्शनाला गेला असावा, असा कयास पोलिसांचा आहे. त्यामुळे मंदिर आणि धार्मिक स्थळांवरही पोलिसांचे लक्ष आहे. यासोबतच गुन्हे शाखा पोलिसांनी आरोपी विवेकचा फोटो जारी करून माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस ठेवले आहे. पोलिस उपायुक्‍त नीलेश भरणे यांनी सात पथकांची सूत्रे सांभाळली आहेत. दरम्यान, पोलिसांचे एक पथक मध्यवर्ती कारागृहात गेले होते. त्याच्या बरॅकमध्ये कोण कैदी होते, याची चौकशी पोलिसांनी केली. मात्र, कैद्यांसोबतही विवेक जास्त बोलत नव्हता, अशी माहिती मिळाली आहे.

प्रेयसीच्या घरावर छापा
संशयित विवेकची सरिता नावाची प्रेयसी आहे. सरिताला एक मुलगी असून पतीपासून ती विभक्‍त झाली आहे. हत्याकांड झाल्याच्या आदल्या दिवशी तो सरितासोबत फिरत होता. त्यामुळे सरिताला याची पूर्वकल्पना असावी, असा संशय पोलिसांना आहे. त्यावरून पोलिसांनी तिच्या भंडारा येथील घरावर छापा घातला. ती सुरुवातीला विवेकला ओळखत नसल्याचे सांगत होती. मात्र पोलिसी खाक्‍या दाखवताच ती पोपटासारखी बोलू लागली. सरिताकडून विवेकबद्दल महत्त्वाची माहिती मिळाल्याची चर्चा आहे.

Web Title: nagpur murder case

टॅग्स