नागपूर : घरात घुसून युवकाचा खून; हुडकेश्‍वरात मध्यरात्रीचा थरार

नागपूर : घरात घुसून युवकाचा खून; हुडकेश्‍वरात मध्यरात्रीचा थरार

नागपूर : नरसाळा परिसरात सोमवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास पाच आरोपींनी एका युवकाचा घरात घुसून खून केला. हा थरार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हुडकेश्‍वरमध्ये घडला. पंकज नारायण कोंडलकर (वय 33, श्रीरामनगर, गोन्हीसीम) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या हत्याकांडात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. विशाल तुमडे, नितीन टुले, गोलू कोहळे, आकाश मोरे आणि अमित पाल यांचा समावेश आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज कोंडलकर हा हुडकेश्‍वरमधील श्रीरामनगरातील नितीन लाकडे यांच्या घरी किरायाने राहत होता. आरोपी नितीन टुले हा घाटरोडवरील एका स्टील कंपनीत कामाला होता. सर्व आरोपी हे दारुडे असून एकाच परिसरात राहतात. रोज रात्री दिघोरी नाक्‍याजवळील एका दारूच्या दुकानात जमा होत होते. चार दिवसांपूर्वी पंकज कोंडलकर आणि आरोपी विशाल तुमडेचा वाद झाला होता. तसेच पंकजकडे विशालचे काही पैसे होते. पंकजने विशालला मारहाण करीत "गेम' करण्याची धमकी दिली होती. पंकज यापूर्वी कुहीतील प्रवीण किंदर्ले हत्याकांडातील आरोपी होता. पंकज हा आपला गेम करेल, अशी भीती विशालला होती. त्यामुळे त्याने पंकजला संपविण्याचा कट रचला.

सोमवारी रात्री नऊ वाजता पाचही आरोपी पंकजच्या घरी आले. त्यांनी पंकजला खूप दारू पाजली. त्यानंतर पंकजवर 40 पेक्षा जास्त सपासप वार करीत त्याला ठार केले. त्याच्या खोलीतून युवकांचा ओरडण्याचा आवाज आल्यामुळे घरमालक नितीन लाकडे आणि भाडेकरू मनोज बोबडे हे दोघेही पंकजच्या खोलीकडे पळत गेले. दरम्यान, चार ते पाच युवक त्याच्या घरातून पळून जाताना दिसले. त्यांच्या हातात तलवार आणि चाकूसारखी धारदार शस्त्रे होती. मनोजने घरात जाऊन बघितले असता पंकज कोंडलकर हा गंभीर जखमी अवस्थेत रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. मनोज आणि घरमालक नितीन यांनी लगेच मदतीसाठी धाव घेतली आणि हुडकेश्‍वरचे ठाणेदार संदीप भोसले यांना माहिती दिली. हुडकेश्‍वर ठाण्यातील ताफा लगेच घटनास्थळावर पोहोचला. पोलिसांनी जखमी पंकजला ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच पंकजचा जीव गेला. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी घरमालक नितीन यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com