पारा घसरला, उकाडा वाढला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

नागपूर - ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील उन्हाची लाट काहीशी ओसरली. सोमवारी नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांतील पारा एक ते तीन अंशांनी खाली आला. असह्य उकाड्याने मात्र नागपूरकरांना चांगलाच घाम फोडला. 

नागपूर - ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील उन्हाची लाट काहीशी ओसरली. सोमवारी नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांतील पारा एक ते तीन अंशांनी खाली आला. असह्य उकाड्याने मात्र नागपूरकरांना चांगलाच घाम फोडला. 

दररोजच्या तुलनेत सोमवारी वैदर्भींना चटके कमी लागले. चंद्रपूर (45.0 अंश सेल्सिअस), ब्रह्मपुरी (44.6 अंश सेल्सिअस), गडचिरोली (41.4 अंश सेल्सिअस) आणि गोंदिया (41.8 अंश सेल्सिअस) येथील तापमानात दोन ते तीन अंशांची घट झाली, तर नागपूरचा पाराही एका अंशाने घसरून 45.2 अंशांवर आला. तापमानात घट झाली असली तरी, दुपारच्या सुमारास उन्हाचे चटके तीव्रतेने जाणवले. उकाडा वाढल्याने अस्वस्थ वाटत होते. दिवसभर अंगातून घामाच्या धारा वाहिल्या. रात्री उशीरापर्यंत उष्ण वारे वाहात होते. 

Web Title: nagpur new high temperature

टॅग्स