२० गाड्या विलंबाने

२० गाड्या विलंबाने

नागपूर - उत्तर भारताच्या अनेक भागांतील धुके आणि अन्य कारणांमुळे रेल्वेची गती मंदावली आहे. मंगळवारी नागपूर विभागातून धावणाऱ्या तब्बल २० रेल्वे गाड्या विलंबाने धावत असल्याची नोंद झाली.

नागपूरमार्गे जाणारी १८२३८ अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्‍स्प्रेस सर्वाधित १८ तास विलंबाने धावत होती. त्यापाठोपाठ १५०१५ गोरखपूर-यशवंतपूर एक्‍स्प्रेस ११.२५ तास, १२६८८ देहरादून-मदुराई एक्‍स्प्रेस ९ तास, 
१२६८७ मदुराई चंदीगढ एक्‍स्प्रेस ८.५० तास, १२४१० हजरत निजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्‍स्प्रेस ८.१५ तास, १२२८६ हजरत निजामुद्दीन-सिकंदराबाद दुरांतो ६ तास, १२६२१ चेन्नई-नवी दिल्ली तमिळनाडू एक्‍स्प्रेस ६ तास, ०२८२१ पुणे-संत्रागाडी एक्‍स्प्रेस ५.२० तास, १२८६० हावडा-मुंबई गीतांजली एक्‍स्प्रेस ४.२५ तास, १२६१६ दिल्ली सराय रोहिल्ला-चेन्नई जीटी एक्‍स्प्रेस ४.२० तास, १२६७० छपरा-चेन्नई गंगाकावेरी ४.३० तास, २२१२६ अमृतसर-नागपूर सुपरफास्ट एक्‍स्प्रेस ४ तास, ११४०४ कोल्हापूर-नागपूर एक्‍स्प्रेस ३.४५ तास, १२६२२ नवी दिल्ली-चेन्नई दक्षिण एक्‍स्प्रेस ३.४५ तास, ११०४६ धनबाद-कोल्हापूर दीक्षाभूमी एक्‍स्प्रेस २ तास तसेच १२६२६ नवी दिल्ली-त्रिवेंद्रम केरला एक्‍स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा १.४० तास बिलंबाने नागपूर स्थानकावर दाखल झाली.  याशिवाय मंगळवारी नियोजित ठिकाणापासून निघून नागपूर स्थानकावर पोहोचणाऱ्या तीन रेल्वेगाड्या नियोजित वेळेपेक्षा अनेक तास उशिरा धाव होत्या. 

१२८८० भूवनेश्‍वर-एलटीटी कुर्ला एक्‍स्प्रेस भूवनेश्‍वर येथूनच तब्बल ६.४५ तास उशिरा रवाना झाली. ही गाडी ७.१५ तास उशिरा धावत होती. ११४०३ नागपूर-कोल्हापूर एक्‍स्प्रेस नागपूर येथून ३ तास उशिरा रवाना झाली. १२५९२ यशवंतपूर-गोरखपूर सुपरफास्ट एक्‍स्प्रेस यशवंतपूर येथून तब्बल १२ तास उशिरा रवाना झाली.

गोरखपूर-सिकंदराबाद एक्‍स्प्रेस धुक्यामुळे रद्द
बुधवारी (ता. १०) गोरखपूर स्थानक येथून सकाळी ६.२५ वाजता सुटणारी आणि गुरुवारी पहाटे ३.५० वाजता नागपूर स्थानकावर पोहोचणारी १२५८९ गोरखपूर-सिकंदराबाद एक्‍स्प्रेस आरंभस्थानाहूनच रद्द करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com