दोनशेची नोट सप्टेंबरमध्ये नागपुरात येणार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

नागपूर - देशात पहिल्यांदाच 200 रुपयांची नोट गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर शुक्रवारी (ता. 25) चलनात आणली असली तरी ही नोट शहरात येण्यासाठी सप्टेंबर महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात ही नोट मेट्रो शहरात आणण्यात आली. मात्र, 50 रुपयांची नवीन नोट ग्राहकांच्या हाती आली आहे. यामुळे 200 रुपयांच्या प्रथमच चलनात येणाऱ्या नोटेबद्दल उत्सुकता आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून 200 रुपयांची नोट अनेकांच्या उत्सुकतेची केंद्रबिंदू ठरली आहे. दिल्ली, मुंबईसह काही शहरांत 200 रुपयांच्या नोटांचे वाटप करण्यात आले. त्या नोटा घेण्यासाठी अनेकांनी रांगाही लावल्या आणि 200 रुपयांच्या नोटांचे दर्शन घेतले. देशात 100 आणि 500 रुपयांमधील एखादी नोट चलनात आणण्याची ही पहिलीच वेळ आहे. नोटेतील सिक्‍युरिटी थ्रेडवर भारत आणि आरबीआय असे लिहिलं आहे. 500 आणि दोन हजारांच्या नव्या नोटा चलनात आल्या त्यावेळी एटीएम मशीनमध्ये बदल करावे लागले होते. कारण या नोटांच्या आकारात बदल होता. 200 रुपयांच्या नोटा नवीन असल्याने एटीएमच्या यंत्रणेची फेरबदल करावी लागणार आहे. केंद्र सरकारने आठ नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि एक हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर सरकारने लगेच दोन हजारांची नोट चलनात आणली. लगेच पाचशेची नोटही चलनात आणली. मात्र. त्याचा आकार लहान असल्याने एटीएमच्या यंत्रणेत बदल करावा लागला होता. नागपूरच्या रिझर्व्ह बॅंकेत गुरुवारीच 50 रुपयांच्या नवीन नोटा आल्या असून, काही बॅंकेतून त्याचे वाटपही झालेले आहे. त्यामुळे ग्राहकांपर्यंत त्या पोहोचल्या आहेत. 

Web Title: nagpur news 200 rupees note