जावयांना लागले सासुरवाडीचे वेध!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

नागपूर - अधिक मास म्हटला की जावयांचे सुगीचे दिवस येतात. या महिन्यात मुलींना व नव्या व जुन्या जावयांना घरी बोलावून वाण देण्याची प्रथा आहे. त्यामुळे अधिक मासात जावयांना वाण व नवीन कपडे दिले जातात. उन्हाळ्यामुळे सध्या जावयांचा आंब्याचा रस आणि अधिक महिन्याच्या वाणांसाठी सासुरवाडीचे वेध लागले आहेत. 

तीन वर्षांनी येणारा अधिक मास उद्या बुधवारपासून सुरू होत आहे. जुन्या परंपरेनुसार या महिन्यात जावयांना घरी बोलावून मान-सन्मान केला जातो. त्यांना नवीन कपडे, वाण देण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत कायम आहे. त्यामुळे यावर्षी नव्याने बंधनात अडकलेल्या व जुन्या जावईबापूंची चांदी असणार आहे.   

अमावस्या संपल्यानंतर अधिक मासाला सुरुवात होणार आहे. दर तीन वर्षांनंतर जावईबापूंना सासुरवाडीकडे जाण्याचा योग असल्याने जावईबापूंचे सर्व लक्ष सासुरवाडीकडे लागले आहे. धोंड्याचा महिना येत असल्याने सासू-सासऱ्यांनीसुद्धा आपल्या लेकीला व जावईबापूंना आपल्या घरी बोलावून वाण देऊन पुण्य पदरात पाडण्यासाठी कंबर कसली आहे. सध्या उन्हाळ्याने अधिकच जोर धरला आहे. 

शेतातील मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी वेग आला आहे. तरीदेखील जावई नाराज होऊ नये म्हणून सासरे काळजी घेताना दिसून येतात. नैसर्गिक संकट, वादळी वारा, अवकाळी पाऊस याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. या  संकटाचा सामना करणाऱ्या कुटुंबीयांनाही या धोंड्याच्या महिन्यात लेकीला व जावयांना घरी बोलवावे लागणार आहे. त्यामुळे जावईबापूंना सासरचा पाहुणचार मिळणार आहे.

सासरकडच्यांची गोची
काळानुरूप जावयांना कपड्याऐवजी सोन्याची अंगठी, चेन, ब्रेसलेट आदींच्या काही जावई हट्टाने सासुरवाडीकडील मंडळी भलतीच जाम झाल्याची चित्रे आहेत. मध्यम वर्गातील नागरिक चांदी, पितळीचे भांड्यांचे वाण जावयांना देतात. काही ठिकाणी ३३-३३ अनारसे, बत्तासे, लाडू यासह इतरही साहित्य देऊन त्यात दिवा लावण्यात येतो. मात्र, रूढी परंपरा जपत असताना सासरकडच्या मंडळींची सध्या गोची होताना दिसते आहे.

अधिक महिन्यात जावयांना वाण देण्यासाठी तांबे आणि स्टीलच्या वस्तूंची मागणी वाढते. उद्यापासून अधिक महिना सुरू होत असल्याने यंदा विशेष तयारी केलेली आहे. स्टील आणि तांब्यांची आकर्षक भांडी विक्रीसाठी आणली आहेत. 
-अशोक संघवी, भांडे व्यापारी  

Web Title: nagpur news aadhik mass