भाजपला भुईसपाट करता येते - पवार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

नागपूर - ""नांदेड महापालिका निवडणुकीतील यशाने कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे नेतृत्व आणखी मजबूत झाले,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्तुती केली. नेतृत्वाचा समर्थ पर्याय मिळाल्यास भाजपला भुईसपाट करता येते, हे नांदेड निकालाने स्पष्ट झाल्याचे पवार यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी अजित पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे शुक्रवारी नागपूरमध्ये आले होते. नागपूर प्रेस क्‍लबने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अशोक चव्हाण यांची मुक्तकंठाने स्तुती केली. नांदेड महापालिकेत कॉंग्रेसला मिळालेल्या यशानंतर भाजपच्या परतीच्या प्रवासाची सुरवात झाल्याच्या अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याचे अजित पवार यांनी समर्थन केले व राष्ट्रवादी कॉंग्रेस कधीही भाजपसोबत नव्हती व राहणार नाही, असेही स्पष्ट केले. 

नांदेडच्या निकालानंतर शिवसेनेच्या मुखपत्रात अशोक चव्हाण यांची स्तुती केली. आता अजित पवार यांनी केलेल्या या स्तुतीला राजकीय रंग मिळाला आहे. विशेष म्हणजे नांदेड महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही अन्‌ शिवसेनेला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. गेल्या तीन वर्षांत भाजपच्या यशाचा आलेख चढता होता. हा आलेख नांदेडमध्ये खाली आला.

Web Title: nagpur news ajit pawar bjp