ऑटोचालकांची वाहतूक उपायुक्त कार्यालयावर धडक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

नागपूर - अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासह विविध मागण्यांसाठी ऑटोचालकांनी मंगळवारी मोर्चा काढून वाहतूक उपायुक्त कार्यालयावर धडक दिली. ऑटोचालकांनी घोषणा देत वाहतूक पोलिसांवर रोष व्यक्त केला. 

टायगर ऑटोरिक्षा संघटनेतर्फे मोर्चाचे आयोजन केले होते. दुपारी बाराला संविधान चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. ऑटोचालक लक्षणीय संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. मोर्च्यात एकामागोमाग येत ऑटोचालकांनी शिस्तीचा परिचय करून दिला. सुमारे दीडच्या सुमारास मोर्चा पोलिस वाहतूक उपायुक्त कार्यालयावर धडकला. जोरदार घोषणाबाजी करीत मोर्चेकऱ्यांनी शासन आणि वाहतूक पोलिसांविरोधात रोष व्यक्त केला. 

पोलिसांकडून अधिकृत वाहनचालकांना त्रास दिला जात असल्याचा मोर्चेकऱ्यांचा आरोप आहे. मेट्रोरेल्वे आणि सिमेंट रोडच्या कामामुळे रस्ते अरूंद झाले आहेत. त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यावर वाहने उभी करायला जागा नसतानाही चालान फाडण्यात येत आहे. ही कारवाई थांबविण्यासह वाहतूक पोलिसांनी ऑटोरिक्षा मीटरने चालवण्याची मोहीम पुन्हा जोमाने सुरू करावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. 

नियमानुसार ऑटो चालविणारे उपाशी 
विदर्भ ऑटोचालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने वाहतूक उपायुक्त रवींद्र परदेशी यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन सादर केले. अवैध प्रवाशी वाहतूक करणारे तुपाशी जेवत आहेत, तर नियमानुसार ऑटो चालविणारे उपाशी आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: nagpur news Auto driver