चालकाने चोरले बसमधील डिझेल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

नागपूर - शहर बसचालकानेच डिझेल चोरी केल्याची घटना परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी उघडकीस आणली. बसमधून डिझेल चोरी करताना त्यांनी बसचालकाला रंगेहात पकडले. शहर बसमध्ये डिझेल चोरीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे यानिमित्त अधोरेखित झाले असून, कंत्राटदाराला दररोज लाखोंचा फटका बसत आहे.

नागपूर - शहर बसचालकानेच डिझेल चोरी केल्याची घटना परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी उघडकीस आणली. बसमधून डिझेल चोरी करताना त्यांनी बसचालकाला रंगेहात पकडले. शहर बसमध्ये डिझेल चोरीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे यानिमित्त अधोरेखित झाले असून, कंत्राटदाराला दररोज लाखोंचा फटका बसत आहे.

शहर बससेवेत सध्या अडीचशे बस रस्त्यावर धावत असून, अनेक बसमधून डिझेलची चोरी होत असल्याची कुणकुण परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांना लागली. त्यांनी गुरुवारी  चोरट्यांचा पर्दाफाश करण्यासाठी जाळे विणले. त्यांनी माहितीच्या आधारे बस क्रमांक एमएच ३१-६१८४ चा वाहनचालक सचिन गेचोडेवर पाळत ठेवली. बर्डी ते डिगडोबा मंदिर बसचा  त्यांनी सहकाऱ्यांसोबत पाठलाग केला. वाहनचालक सचिन गेचोडे याने बस थांबवून २० लिटर डिझेल बसच्या टॅंकमधून काढले. त्याचवेळी मागावर असलेल्या बंटी कुकडे यांनी बसचालक गेचोडेला रंगेहात पकडले. या वेळी गेचोडे ज्याला डिझेल विकायचा त्या आकाश नावाच्या तरुणालाही गाठले.

आकाशने गेचोडेने त्याला यापूर्वी डिझेल विकल्याची कबुली दिली. त्यामुळे गेचोडे पूर्वीपासूनच बसमधील डिझल चोरी करीत असल्याचेही स्पष्ट झाले. ही बस हंसा ट्रॅव्हल्स या कंत्राटदार कंपनीची असून, त्यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी तक्रार नोंदविली. शहर बसमधील डिझेल चोरीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची माहितीही पुढे आली. गेचोडे हा कन्हानजवळील डोंगरी खुर्द येथील रहिवासी आहे.

१२ जण बडतर्फ
शहर बसमधील अनेक कंडक्‍टर प्रवाशांकडून तिकीटचे पैसे घेतात. परंतु, प्रवाशाला तिकीट देत नसल्याचीही प्रकरणे उघडकीस आली. विशेषतः यात मोठ्या प्रमाणात महिला बस कंडक्‍टरचा समावेश असल्याचे सूत्राने नमूद केले. आतापर्यंत महिला कंडक्‍टरसह १२ जणांना बडतर्फ केले आहे.

Web Title: nagpur news Bus driver

टॅग्स