फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविणार काडतुसे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

नागपूर - शासकीय निवासाच्या शौचालयाजवळ जिवंत ३३० काडतुसे आणि १०१० बुलेट केस आढळल्याने पोलिस दलात खळबळ उडाली. धंतोली पोलिसांनी सर्व काडतुसे जप्त केली असून, लवकरच फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

झोन दोनचे उपायुक्‍त राकेश ओला यांनी प्रकरणाची फाइल मागितली असून, पोलिस आयुक्‍तांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले आहे. अजनी रेल्वे स्टेशनसमोरील मेडिकल कॉलनीतील एका क्‍वार्टरच्या शौचालयाजवळ जिवंत काडतुसे सापडली होती. धंतोली पोलिसांना माहिती मिळताच शोधमोहीम राबविण्यात आली. 

पोलिसांनी ३३० काडतुसे आणि १०१० बुलेट केस जप्त केले. २ महाराष्ट्र मेडिकल कंपनीच्या एनसीसी विंगचे हवालदार डी. के. श्रीवास्तव यांच्या क्‍वॉटर्सच्या शौचालयाजवळून काडतुसे जप्त करण्यात आली. ते सध्या सिक्‍कीममध्ये कार्यरत आहेत. हे क्‍वार्टर गेल्या तीन महिन्यांपासून बंद होते.

Web Title: nagpur news Cartridge