आठ महिन्यांपासून सीसीटीव्ही बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जानेवारी 2018

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसरासह इतर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार असल्याची माहिती तीन महिन्यांपूर्वी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली होती. मात्र, अद्याप विद्यापीठाकडून यासंदर्भात कुठलीच कारवाई झाली नसल्याचे दिसते. विशेष म्हणेज सध्या विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारताचा परिसर सोडता परीक्षा भवन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा आठ महिन्यांपासून बंद आहे. 

विद्यापीठाचा कॅम्पस बराच मोठा आहे. चाळीसहून अधिक विभाग, ग्रंथालय आणि वित्त विभागाचे कार्यालय या परिसरात आहेत. याशिवाय अमरावती मार्गावर असलेल्या बीएड, एमबीए आणि विधी महाविद्यालयाचाही त्यात समावेश होतो. मात्र, या परिसरातील सुरक्षेचा प्रश्‍न नेहमीच ऐरणीवर असतो. यापूर्वी विद्यापीठाने महाराष्ट्र पोलिस सिक्‍युरिटीज मंडळाकडे मुख्य प्रशासकीय इमारतीसह वसतिगृहांच्या सुरक्षेची जबाबदारी दिली. मात्र, इतर परिसरात केवळ खासगी सिक्‍युरिटीच्या माध्यमातून काम चालविले जाते. असे असताना, दिवसभरात विभाग आणि इतर परिसरातील हालचालीवर कुलगुरू कार्यालयासह इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची नजर राहावी यासाठी विद्यापीठ परिसर आणि इतर विभागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला होता. त्यातून दुहेरी नियंत्रण प्रणाली विकसित करण्याचा विद्यापीठाचा मानस होता. ज्यामुळे विभागप्रमुखांना त्यांच्या विभागावर नियंत्रण तर विभागासह संपूर्ण परिसर कुलगुरू, कुलसचिव आणि प्र-कुलगुरू यांना बघता येणार होता. मात्र, याला तीन महिन्यांचा कालावधी निघून गेला आहे. अद्याप सीसीटीव्ही संदर्भात निविदाही काढण्यात आलेली नसल्याचे समजते. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचा प्रस्ताव विद्यापीठाने गुंडाळला की काय, असा प्रश्‍न निर्माण होतो आहे.

Web Title: nagpur news cctv close in last eight month