सिमेंट रस्त्यांसाठी मिळेना कंत्राटदार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

नागपूर - पहिल्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांची निम्मी कामे रखडली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील निम्म्यांचेच काम सुरू झाले. तिसऱ्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांची घोषणाही केली.  मात्र, चारवेळा निविदा काढून एकही कंत्राटदार फिरकला नसल्याचे दिसून येत आहे. महापालिकेकडे अनेक कंत्राटदारांची देणी शिल्लक असल्याने कंत्राटदारांनी प्रतिसाद न दिल्याची चर्चा रंगली आहे.

दुसऱ्या टप्प्यात ३०० कोटींच्या सिमेंट रस्त्यांची घोषणा केली. यात ६९ रस्ते असून, त्यांची लांबी ७०.८८ किमी आहे. यातील केवळ ३५ कामे सुरू आहेत. अर्थात अद्याप निम्म्या कामांना हात लागला नाही. तोच तिसऱ्या टप्प्यातही ३०० कोटींच्या रस्त्यांची घोषणा केली. त्यानुसार रस्ते निश्‍चित केले. उत्तर नागपूर, पश्‍चिम नागपूर व दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी सात, मध्य व पूर्व नागपुरात प्रत्येकी पाच व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघात सर्वाधिक ९ रस्त्यांचा समावेश आहे.

सहा मतदारसंघांसाठी महापालिकेने सहा पॅकेज तयार केले. उत्तर नागपूरसाठी २५.८६ कोटी, मध्य नागपूरसाठी २२.९५ कोटी, पूर्व नागपूरसाठी ४६.५५ कोटी, पश्‍चिम नागपूरसाठी ५७.३७ कोटी, दक्षिण नागपूरसाठी ३८ कोटी, दक्षिण-पश्‍चिम नागपूरसाठी ४५.९७ कोटींच्या रस्त्यांसाठी निविदा मागविल्या. एकूण चारवेळा निविदा काढल्या. परंतु, या निविदांकडे कंत्राटदारांनी पाठ फिरविली. महापालिकेतील अधिकारी कंत्राटदारांची देयके देण्यात नाकीनऊ आणत असल्याने निविदांना प्रतिसाद मिळाला नसल्याचे कंत्राटदाराने सांगितले. 

Web Title: nagpur news cement road