उपराजधानीतील चिमुकल्यांचा दिल्लीत झेंडा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

नागपूर - प्रजासत्ताकदिनाच्या राष्ट्रीय पथसंचलनात उपराजधानीतील १६० बालकांनी ‘बरेदी’ नृत्य सादर करीत देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आपला झेंडा फडकविला. त्यांनी सादर केलेल्या नृत्याला प्रथम पुरस्कार मिळाला. दहा आशियाई देशांच्या प्रमुखांसह देशातील नागरिकांसमोर या चिमुकल्यांनी सांस्कृतिक व परंपरांनी परिपूर्ण असलेले बरेदी नृत्य सादर केले. 

नवी दिल्लीतील कडक थंडीत दररोज राजपथावर सर्व सैन्याच्या तुकडीसोबत सराव करीत नागपुरातील बालके प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या निवड समितीने सांस्कृतिक कार्यक्रमात या लहान मुलांच्या सादरीकरणाला प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळा संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते करण्यात आला. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या संयोजनामध्ये हे सादरीकरण दिल्ली येथे करण्यात आले होते. देशातील संस्कृतीला नागरिकांसमोर सादर करण्याचा प्रयत्न नियमित करीत असते.

Web Title: nagpur news child baredi dance