सीएमच्या घराजवळ चोरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाजवळच एका डॉक्‍टरकडे घरफोडी झाली. मुख्यमंत्री निवासाच्या अगदी हाकेच्या अंतरावर घरफोडी झाल्यामुळे शहरातील कायदा व सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला.

पोलिसांच्या माहिनुसार, ट्रॅफिक पार्क, झेंडा चौक-धरमपेठमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थान शेजारच्या तिसऱ्या क्रमांकाच्या इमारतीत डॉ. चंद्रकांत बिडकर राहतात. बुधवारी डॉ. बिडकर हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. घर कुलूपबंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले ७० हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. गुरुवारी सकाळी डॉ. बिडकर हे घरी परत आले. त्यावेळी त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरातील सामान अस्ताव्यस्त दिसले. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सीताबर्डी पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक चव्हाण हे ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घरातील चोरी गेलेल्या वस्तू आणि दागिन्यांबाबत माहिती घेतली. पंचनामा करून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Nagpur news CM's house theft