सत्ताधाऱ्यांविरुद्ध आंदोलनाची रणनीती 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

नागपूर - नागरिकांच्या समस्यांवर सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय शहर काँग्रेसने काल  झालेल्या बैठकीत घेतला. वाढीव मालमत्ता कर, सिमेंट रस्त्यांची अर्धवट कामे आदींबाबत  सत्ताधाऱ्यांविरुद्ध आक्रमक होण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी केला. पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीवरही बैठकीत खल झाला. 

शहर काँग्रेसची बैठक रविवारी (ता. ९) शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेत देवडिया भवनात पार पडली. बैठकीत उमाकांत अग्निहोत्री, विक्रम पनकुले, डॉ. गजराज हटवार, जयंत  लुटे, प्रा. दिनेश बानाबाकोडे, अनिल पांडे, अक्षय समर्थ, ॲड. अशोक यावले, फिरोज खान,  डॉ. सूर्यकांत भगत, अशोख निखाडे, मिलिंद सोनटक्के, गीता काळे यांनी पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीबाबत सूचना केल्या. उपस्थित काँग्रेस नेत्यांनी शहरातील बंद पथदिवे, रस्त्यांवरील खड्डे, कचरा, दूषित पाणीपुरवठा, सिमेंट रस्त्यांची अर्धवट कामे यावर आंदोलन करून आक्रमक होण्याच्या सूचनाही पुढे आल्या. ठाकरे यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांविरुद्ध आंदोलन करून नागरिकांना न्याय मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे सांगितले.लोकसभा निवडणुकीसाठी आतापासून पक्षबांधणीवर भर देण्यात येणार असून, बूथनिहाय बांधणीला प्राधान्य देण्याच्याही सूचना त्यांनी केल्या. प्रास्ताविक डॉ. गजराज हटवार यांनी केले. आभार संदेश  सिंगलकर यांनी मानले.  

मालमत्तांची माहिती गोळा करणार 
शहर काँग्रेसची शहरात विविध ठिकाणी मालमत्ता आहे. देवडिया काँग्रेस भवनासह इतवारी अनाज बाजार येथे ५ हजार चौरस फूट भूखंड आहे. गंजीपेठ येथेही भूखंड आहे. या सर्व मालमत्ता व भूखंडांच्या मालकीचे कागदपत्रे जमा करण्याचा निर्णयही बैठकीत झाला.

Web Title: nagpur news congress