नागपुरातील असंतुष्ट गट रिकाम्या हाताने परतला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

नागपूर - कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रभारी मोहन प्रकाश व नागपूर शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांना हटविण्यात यावे, या मोहिमेवर गेलेले नागपुरातील असंतुष्ट माजी मंत्रिगट रिकाम्या हाताने परतले आहेत. 

नागपूर - कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रभारी मोहन प्रकाश व नागपूर शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांना हटविण्यात यावे, या मोहिमेवर गेलेले नागपुरातील असंतुष्ट माजी मंत्रिगट रिकाम्या हाताने परतले आहेत. 

सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत व अनीस अहमद या तिन्ही माजी मंत्र्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. चव्हाण यांना आव्हान देण्याचा प्रयत्न ही मंडळी गेल्या काही दिवसांपासून करीत आहे. या मोहिमेअंतर्गत हे तिन्ही माजी मंत्री मंगळवारी (ता.19) दिल्लीला रवाना झाले होते. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या अमेरिकेत असल्याने कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार खासदार अहमद पटेल यांना भेटण्याचा प्रयत्न या गटाने केला; परंतु अहमद पटेल त्यांना भेटले नाहीत. त्यामुळे या तिन्ही नेत्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, मध्य प्रदेशचे नेते खासदार कमलनाथ, कॉंग्रेसचे महासचिव मधुसूदन मिस्त्री यांची भेट घेतली व आपली कैफियत ऐकविली. 

दिल्लीतील नेत्यांचे अशोक चव्हाण यांना समर्थन असून, त्यांना इतक्‍यात बदलण्याची कोणतीही शक्‍यता नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या माजी मंत्रिगटाने नागपुरातील कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात, अशी मागणी केल्याचे समजते. या मागणीला माजी आमदार अशोक धवड यांनी दुजोरा दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur news congress ashok chavan