कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेताच पटोले रेणुका देवीच्या चरणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

नागपूर - कॉंग्रेसमध्ये आज अधिकृत प्रवेश घेतल्यानंतर माजी खासदार नाना पटोले थेट रेणुका देवीचे दर्शन घेण्यासाठी माहूरला रवाना झाले. पटोले यांनी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. 

कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ते सिंदखेडराजा येथून 12 जानेवारीपासून पश्‍चाताप यात्रा काढणार होते. राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थानाहून ही यात्रा साकोली या त्यांच्या गावाला जाणार होती. तेथे यात्रेचा समारोप करीत राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये शिवजयंतीला (ता. 19 फेब्रुवारी) कॉंग्रेस प्रवेशाचा जंगी कार्यक्रम होणार होता. परंतु कोरेगाव भीमा हिंसाचारामुळे ही यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे. 

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, पटोले सिंदखेड राजा येथे जाऊन राजमाता जिजाऊला अभिवादन करणार आहेत. आज दिल्लीत कॉंग्रेसप्रवेश झाल्यानंतर ते नागपुरात आले व थेट यवतमाळला रवाना झाले. तेथून ते माहूरला रेणुका देवीच्या दर्शनासाठी गेले. तेथूनच ते सिंदखेडराजा येथे जाणार आहेत. 

केंद्र व राज्य सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे. भाजपने दिलेली आश्‍वासने न पाळल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये अधिक वाढ झाली आहे. यासाठी आता पश्‍चाताप यात्रा काढणार आहे. 
- नाना पटोले, माजी खासदार

Web Title: nagpur news congress Nana Patole