नराधम बापाचे मुलीशी चाळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

नागपूर - सख्ख्या बापाने १५ वर्षीय मुलीशी वारंवार अश्‍लील चाळे करीत विनयभंग केल्याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी उद्धव (४४) यास अटक केली. पीडित मुलगी आई-वडील व लहान भावासोबत गिट्टीखदान हद्दीत राहते. सिव्हिल लाइन्स येथील एका शाळेत ती दहाव्या वर्गात शिकते. मे २०१६ मध्ये मुलीची आई आजारी होती. आईला दवाखान्यात भरती केले होते. त्यामुळे मुलगी घरी एकटीच राहायची. दरम्यान, ती घरात झोपली असताना उद्धवने तिच्याशी अश्‍लील चाळे करीत शारीरिक संबंधाची मागणी केली. मुलीने नकार देत प्रतिकार करीत आईला सांगण्याची ताकीद दिली. आजारातून बऱ्या झालेल्या आईला हा प्रकार सांगितला होता.

नागपूर - सख्ख्या बापाने १५ वर्षीय मुलीशी वारंवार अश्‍लील चाळे करीत विनयभंग केल्याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी उद्धव (४४) यास अटक केली. पीडित मुलगी आई-वडील व लहान भावासोबत गिट्टीखदान हद्दीत राहते. सिव्हिल लाइन्स येथील एका शाळेत ती दहाव्या वर्गात शिकते. मे २०१६ मध्ये मुलीची आई आजारी होती. आईला दवाखान्यात भरती केले होते. त्यामुळे मुलगी घरी एकटीच राहायची. दरम्यान, ती घरात झोपली असताना उद्धवने तिच्याशी अश्‍लील चाळे करीत शारीरिक संबंधाची मागणी केली. मुलीने नकार देत प्रतिकार करीत आईला सांगण्याची ताकीद दिली. आजारातून बऱ्या झालेल्या आईला हा प्रकार सांगितला होता. परंतु, मुलीच्या इभ्रतीची भीती असल्याने मुलीने या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नव्हती. त्यामुळे उद्धवची हिंमत वाढली. त्यानंतर संधी मिळेल त्यावेळी तो तिच्याशी अश्‍लील चाळे करीत बळजबरी करीत होता. या कारणावरून मुलीच्या आई-वडिलांमध्ये भांडणदेखील झाले होते. परंतु, उद्धवच्या वागणुकीत फरक पडला नव्हता. त्यामुळे मुलीला घेऊन मंगळवारी तिची आई गिट्टीखदान पोलिसात आली. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवून उद्धवला अटक केली. 

युवतीचा विनयभंग 
रात्रीच्या वेळी लघुशंकेसाठी गेलेल्या युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी राजेंद्र फुलचंद विश्वकर्मा (४२) याच्यावर गुन्हा दाखल केला. १३ जानेवारी रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास पीडित २० वर्षीय युवती लघुशंकेसाठी घराबाहेर निघाली होती. त्यावेळी राजेंद्रदेखील तिच्यामागे गेला आणि अंधाराचा फायदा घेऊन तिच्याशी अश्‍लील चाळे केले. युवतीच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: nagpur news crime

टॅग्स