‘मास्टरमाइंड’ला त्वरित अटक करा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

नागपूर - शहरातील तरुण व्यवसायी अतुल डहरवालच्या हत्याप्रकरणातील ‘मास्टरमाइंड’ला तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी शनिवारी (ता. १३) मित्र परिवाराने कॅण्डल मार्च काढला. मध्यप्रदेश पोलिसांच्या चौकशीवर संशय व्यक्त करून सीबीआय चौकशी करून खऱ्या आरोपीला शिक्षा देण्याची मागणीही केली.

अतुल डहरवालच्या हत्येने व्यापारी वर्गात तीव्र संताप आहे. प्रकरणाची चौकशी मध्यप्रदेशातील लोधीखेडा पोलिस ठाण्यांतर्गत करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपी शिवासह आणखी काही आरोपींना अटक केली. मात्र, नागपुरातील एक व्यक्ती प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप गांधीबाग मित्र परिवाराने केला. प्रमुख आरोपींच्या अटकेची मागणी करीत सुभाष पुतळा ते सतरंजीपुरापर्यंत कॅण्डल मार्च काढण्यात आला. कॅण्डल मार्चमध्ये शेकडो तरुणांनी भाग घेतला.

अतुल डहरवार यांच्या दानशूल व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू मित्रांनी उलगडले. मित्रांसाठी धावून जाणाऱ्या अतुलची प्रतिमा मलिन केली जात असल्याचा आरोप करीत आतापर्यंत केलेल्या चौकशीवरही संताप व्यक्त केली. कॅण्डल मार्च लकडगंज पोलिस ठाण्यात पोहोचल्यानंतर प्रकरणाची सीबीआय चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचे निवेदन पोलिसांना दिले.

Web Title: nagpur news crime Atul Dahlwal murder case