"सीबीआय'मध्ये नोकरीचे आमिष 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

नागपूर - सीबीआय, सीआयडीसह इतर शासकीय खात्यात नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने 13 तरुणांकडून 11 लाख 95 हजार रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या दोघांवर शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानेश्‍वर वालदे (55) व विनय ज्ञानेश्‍वर वालदे (22, दोन्ही रा. कुंभारपुरा) असे आरोपींचे नाव आहेत. 

नागपूरसह इतर भागातील 13 तरुणांशी दोन्ही आरोपींनी मैत्री वाढवली. त्यानंतर विनय हा शासकीय नोकरीत असून, त्याची राजकीय नेते व बड्या अधिकाऱ्यांशी जवळीक असल्याचे भासवण्यात आले. त्यामुळे विनय हा तरुणांना सीबीआय, सीआयडीसह इतर शासकीय खात्यात सहज नोकरीवर लावू शकत असल्याचे चित्र निर्माण केले गेले. 

शासकीय नोकरी मिळण्याची आशा बघत 13 तरुणांनी या पिता-पुत्राकडे 11 लख 95 हजार रुपये रोख दिले. नोकरी लागल्यावर आणखी विशिष्ट रक्कम देण्याचे निश्‍चित झाले. विनयने उमेदवारांना वेगवेगळ्या खात्याचे बनावटी नियुक्तिपत्र दिले. परंतु, काही कारण सांगत तो पत्र परत घेत होता. त्यानंतर काही उमेदवारांनी पैसे परत मागितले. परंतु, दोघांकडून पैसे परत केल्या जात नव्हते. शेवटी फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यावर काही उमेदवार न्यायालयात गेले. न्यायालयाच्या सूचनेवरून शांतीनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. 

"स्पेशल छब्बीस'मधून मिळाली प्रेरणा 
"स्पेशल छब्बीस' या हिंदी चित्रपटात अभिनेता अक्षयकुमार आणि अनुपम खेर हे अशाच प्रकारचे तोतया सीबीआय अधिकारी बनून लोकांना लुटतात. तसेच सीबीआयमध्ये अनेक तरुणांची बोगस भरतीसुद्धा करतात. त्याच चित्रपटातून पिता-पुत्रांनी प्रेरणा घेऊन बेरोजगारांना लुटण्याचे नियोजन आखले. ते काही प्रमाणात यशस्वीसुद्धा झाले. मात्र, एका उमेदवाराने सीबीआयमध्ये जाऊन चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचा भंडाफोड झाला. 

Web Title: nagpur news crime CBI