त्रस्त नवरोबाने भिरकावली न्यायाधीशांच्या दिशेने खुर्ची

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

नागपूर - सततच्या वैवाहिक कुरबुरींमुळे त्रस्त झालेल्या आणि घटस्फोटासाठी चकरा मारणाऱ्या एका नवरोबाने मंगळवारी (ता. २३) कुटुंब न्यायालयातातील न्यायाधीश पलक जमादार यांच्या आसनावर फायबरची खुर्ची फेकून रोष व्यक्त केला. दुर्दैवाने न्यायाधीश जागेवर उपस्थित नसल्याने अनुचित घटना टळली. मात्र, नवरोबाने केलेल्या या ड्राम्यामुळे कुटुंब न्यायालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

कृष्णा सुंदरलाल श्रीवास (३५) असे संबंधित व्यक्तीचे नाव आहे. तो गणेशपेठेतील रहिवासी आहे. त्याने २०१५ मध्ये कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. याचिकेवर मंगळवारी न्यायाधीश पलक जमादार यांच्यासमक्ष सुनावणी होती. त्यासाठी तो न्यायालयात आला होता. कुटुंब न्यायालय वकील संघटनेचे उपाध्यक्ष व प्रत्यक्षदर्शी ॲड. श्‍याम अंभोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १.३०च्या सुमारास श्रीवास आरडाओरड करीत न्यायालयात आला. प्रवेशद्वारावरील पोलिसांना हुलकावणी देऊन तो थेट पहिल्या माळ्यावर चढला. दरम्यान, त्याने पक्षकारांना न्यायालय प्रकरणांची माहिती देणाऱ्या संगणकावर हेल्मेट आदळले. तेथून पुढे येऊन त्याने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाच्या कार्यालयाची फायबरची खुर्ची पहिल्या माळ्यावरून खाली फेकली. त्यामुळे खुर्ची तुटून निकामी झाली व खाली उभ्या वाहनांचे काही प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर तो ओरडत न्या. जमादार यांच्या न्यायालयात गेला. त्याने तेथील फायबरची खुर्ची उचलून ताकदीने न्यायासनावर फेकली. त्यामुळे न्यायाधीशांची वजनी लाकडी खुर्चीही पडली तसेच आसनावरील काच फुटली. मधल्या सुटीची वेळ असल्यामुळे न्या. जमादार चेंबरमध्ये बसून होत्या. परिणामी, मोठा अनर्थ टळला.

श्रीवासला ताब्यात घेण्यात न्यायालयातील पोलिसांनी विलंब केला. न्यायासनावर खुर्ची फेकेपर्यंत कोणीही त्याला पकडले नाही. श्रीवासला न्या. जमादार यांच्या न्यायालयात पकडून सीताबर्डी पोलिसांच्या स्वाधीन केले.

Web Title: nagpur news crime in court