भूखंड विक्रीच्या नावावर फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

नागपूर - प्रॉपर्टी डीलरने बनावट कागदपत्राद्वारे जमिनीची विक्री करून एक कोटीची फसवणूक केल्याचा प्रकार अजनीत उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून प्रॉपर्टी डीलर सचिन जागोराव पाटील (४५, रा. दिनप्रजाहित सोसायटी, नरेंद्रनगर) याला अटक केली.

सचिनने अजनीतील भूखंडावर कब्जा केला. तो भूखंड विकत घेतल्याचे दाखवून बनावट कागदपत्रे तयार केले. १ जानेवारी २०१० मध्ये तो भूखंड विक्रीस काढला. त्यावर छोटे-छोटे प्लॉट्‌स पाडून अनेकांना गंडा घालून लाखो रुपये उकळत विक्रीपत्र लिहून दिले. शरद ऊर्फ शरदचंद्र नारायण श्रीपत (६९, रा. सोमलवाडा) यांच्याशी २०१० मध्ये भूखंडाचा ७६ लाखांत सौदा केला.

भूखंडाची रक्‍कम धनादेश व रोखमध्ये घेतली. पुढच्या वर्षी भूखंड नावे करून देण्याचे आमिष दाखवले. मात्र, १७ वर्षांपासून भूखंड नावे करून दिला नाही. तसेच पैसेही परत न करता फसवणूक केली. 

तसेच तो भूखंड अन्य काही ग्राहकांना २९ लाखांना विकला. त्या ग्राहकांकडूनही पैसे घेतले. मात्र, भूखंड नावे करून न देता फसवणूक केली. याप्रकरणी शरद श्रीपत यांनी अजनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून  सचिन पाटीलला अटक केली.

Web Title: nagpur news crime plots