सुदर्शन, माझा तुझ्यावर ‘भरोसा’ नाय हाय!

सोमवार, 7 ऑगस्ट 2017

नागपूर - शहरात प्रेमाचा ‘पोलिसी’ त्रिकोण पाहावयास मिळाला. सहकारी पोलिस महिलेशी अधिकाऱ्याचे मधुर संबंध होते. याची माहिती अधिकाऱ्याच्या पोलिस पत्नीला मिळाली. तिने पतीच्या प्रेयसीला गाठून हिसका दाखविला. सुदर्शन, आता माझा तुझ्यावर ‘भरोसा’ नाय हाय,  असे ती म्हणाली. पतीने माफी मागितल्यावर प्रकरण निवळले.     

नागपूर - शहरात प्रेमाचा ‘पोलिसी’ त्रिकोण पाहावयास मिळाला. सहकारी पोलिस महिलेशी अधिकाऱ्याचे मधुर संबंध होते. याची माहिती अधिकाऱ्याच्या पोलिस पत्नीला मिळाली. तिने पतीच्या प्रेयसीला गाठून हिसका दाखविला. सुदर्शन, आता माझा तुझ्यावर ‘भरोसा’ नाय हाय,  असे ती म्हणाली. पतीने माफी मागितल्यावर प्रकरण निवळले.     

नागपूर पोलिस विभागात पती-पत्नी दोघेही अधिकारी पदावर...दोघेही नागपुरातच कार्यरत.... पत्नी पोलिसांच्या भरोसा विभागात तर पती इंडस्ट्रीयल एरियातील एका पोलिस ठाण्यात कार्यरत... कामाच्या व्यापामुळे घराकडे दुर्लक्ष होत असेल, असे वाटत असताना पोलिस अधिकारी असलेल्या पत्नीच्या मनातली शंकेची पाल चुकचुकली...तिने लगेच गुप्त माहिती काढणे सुरू केले... आणि बिंग फुटले.

पोलिस अधिकाऱ्याचे सिव्हिल लाइन्सजवळील नियंत्रण विभागाजवळ असलेल्या एका कार्यालयातील महिला पोलिस शिपायाशी प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती कळली. चार ऑगस्टला सायंकाळी त्याची पत्नी कार्यालयाजवळ आली... पतीची प्रेयसी असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला कार्यालयाबाहेर बोलावले...  शेजारच्या कॅंटिनमध्ये नेऊन प्रेमप्रकरणाबाबत विषय छेडला. त्या महिला कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे प्रेमाची कबुली दिल्यानंतर महिला अधिकाऱ्याचा ‘इगो’ दुखावला. तिचे केस पकडले आणि धुलाई केली...ती वाचविण्यासाठी पळत सुसाट सुटली... महिला अधिकारी तिचा पाठलाग करून ‘फिल्मीस्टाइल’ने मारहाण करीत होती... शेवटी पोलिस अधिकारी असलेल्या पतीने पत्नीची माफी मागून यापुढे संबंध न ठेवण्याचे आश्‍वासन दिले आणि प्रकरण निवळले. मात्र, तोपर्यंत या प्रेमप्रकरण आणि धुलाईची शहर पोलिस दलात चांगलीच चर्चा रंगली होती, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. एका पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याने विभागातीलच ‘टू स्टार’ असलेल्या युवतीशी मैत्री केली. त्यानंतर दोघांनीही प्रेमविवाह केला. दोघांचीही नागपुरात पोस्टिंग असून दोघांचाही संसार सुरळीत सुरू होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून घराकडे दुर्लक्ष होत होते. 

व्हॉट्‌सॲपच्या चॅटिंगवरून संशय
पती तासन्‌तास कुणाशीतरी व्हॉट्‌सॲपवर चॅटिंग करीत होते. पोलिसांच्या एका सेलमध्ये कार्यरत असलेल्या पत्नीला संशय आला. तिने गुप्तहेर गाठून माहिती काढली. पतीचे पोलिस शिपाई महिलेशी सूत जुळले. ती खात्यात तशीही प्रेमप्रकरणामुळे चर्चितच आहे. यापूर्वीही तिने एका धरमपेठमधील हवालदाराला लुटल्याची माहिती समोर आली. 

साहेब म्हणाले, तुझ्याशिवाय जगू शकत नाही
शुक्रवारी सायंकाळी पोलिसाची पत्नी पतीच्या प्रेयसीच्या कार्यालयात पोहोचली. तिने पतीच्या प्रेयसीला बाहेर बोलावले. त्यानंतर पतीच्या प्रेमप्रकरणावर विचारणा केली. ‘साहेब म्हणाले, मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. नकार दिल्यास जिवाचे बरे-वाईट करेल.’ असे ऐकताच महिला पोलिसाने तिची धुलाई केली. रुद्रावतार बघून ती पळायला लागली. मात्र, तिचा पाठलाग करून चांगलाच चोप दिला. 

Web Title: nagpur news crime police