नागपूर जिल्ह्यात 25 जणांना डेंगीचा डंख 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

नागपूर - जिल्ह्यात एकीकडे "स्वाइन फ्लू'ची दहशत आहे. मलेरियाने हातपाय पसरले असताना नागपूर शहर आणि ग्रामीण 25 जणांना डेंगीच्या डासाने डंख मारला आहे. मात्र, महापालिकेचा आरोग्य विभाग असो की, ग्रामीण भागातील आरोग्ययंत्रणा यांनी फारशी दखल घेतली नाही. केवळ आजाराची लागण झाल्याची नोंद घेण्यात येत आहे. यातील बहुतांश रुग्ण मागील अडीच महिन्यांतील असल्याची माहिती आहे. 

इडिस इजिप्ताय आणि एडिस अल्बोपिक्‍ट्‌स मादी डासांमुळे डेंगी पसरतो. हे डास मादी डासांच्या डंखाच्या माध्यमातून मानवी शरीरात पसरतात. हे डास दिवसा सक्रिय असल्यामुळे फारसे माहिती होत नाही. डेंगीच्या संसर्गाने ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण आहे. विशेष असे की, हे डास स्वच्छ पाण्यात तयार होत असल्यामुळे महापालिकेने डासांची शोधमोहीम सुरू केली. डास अळ्या दिसल्या की, नोटीस बजावतात. नोटीस देऊन पुढे काही होत नसल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यात जानेवारीपासून पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यांत डेंगीच्या चाचणीत पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची शहरातील महापालिकेच्या यादीत नोंद नव्हती. मात्र, गेल्या तीन महिन्यांत ही संख्या वाढली. जुलैअखेर आरोग्य विभागाने घेतलेल्या आढाव्यात डेंग्यूचे शंभरावर रुग्ण संशयित चाचणीत दोषी आढळल्याची नोंद घेण्यात आली. त्यातील 13 रुग्ण हे एकट्या नागपूर महापालिकेच्या हद्दीतील आहेत. तर उर्वरित 12 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. नागपूर जिल्ह्यासह गडचिरोलीतही 25 डेंग्यूग्रस्तांची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. 

डास अळ्यांवर नियंत्रण नाही 
डेंग्यू पसरविणारे डास हे स्वच्छ पाण्यात वाढळतात. शहरी भागांत घरांमध्ये पिण्याचे आणि वापराचे पाणी साठवून ठेवले जाते. शहरी भागांत घरामधील कूलर अद्याप निघाले नाही. कूलरच्या पाण्याच्या टाकीत डास दिसतात. आठ दिवस पाणी साठवून ठेवले की, डास अळ्या तयार होतात. महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाणी साठवून ठेवण्यावर नियंत्रण मिळविले नसल्याने शहरांत मध्ये रुग्ण वाढल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

Web Title: nagpur news dengue