‘डेव्हलपिंग ग्रोथ स्ट्रॅटेजी फॉर विदर्भा’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

नागपूर - विदर्भ वैधानिक विकास मंडळाद्वारे ‘डेव्हलपिंग ग्रोथ स्ट्रॅटेजी फॉर विदर्भा’ हा अभ्यास अहवाल तयार करण्यात येणार आहे. याकरिता विदर्भाच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध योजना, कामकाजाचा व प्रगतीचा आढावा घेण्यात आला. विदर्भामध्ये उपलब्ध असलेली संसाधने व क्षमता लक्षात घेऊन विदर्भाच्या विकासासाठी विदर्भ वैधानिक विकास मंडळातर्फे अहवाल तयार केला जात आहे. 

विदर्भ वैधानिक विकास मंडळाची पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे पार पडली. या वेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, अभ्यास अहवाल उपसमितीचे प्रमुख तथा विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चांद्रायण, सदस्य डॉ. विनायक देशपांडे, दुष्यंत देशपांडे, प्रज्ञा नगरकर, विदर्भ विकास मंडळाचे सहसंचालक अरविंद देशमुख व जिल्हा नियोजन अधिकारी के. व्ही. फिरके उपस्थित होते. कृषी व पणन विभाग, आत्मा, पशुसंवर्धन व दुग्धविकास तसेच मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत या क्षेत्रातील समस्या, त्यावरील उपाययोजना, उत्पादनवाढीसाठी आवश्‍यक उपाययोजना व या क्षेत्रामध्ये रोजगारनिर्मितीच्या संधी यावर या वेळी चर्चा झाली. तसेच जलसंपदा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातील समस्या व  सद्यस्थितीत राबविण्यात येत असलेल्या योजना व त्यांची यशस्वी अंमलबजावणी याबाबत चर्चा झाली. विदर्भामध्ये उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच मेट्रोमध्ये स्थानिक युवकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीची उपलब्धता तसेच बॅंकाद्वारे बेरोजगार युवकांना मिळत असलेले मुद्रा लोन व शासनाच्या इतर विभागाद्वारे सुरू असलेल्या विकासकामांचा, समस्यांवरील उपाययोजनांचा प्रभावी परिणाम व लाभासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. विदर्भामध्ये उपलब्ध संसाधने व क्षमता लक्षात  

‘डेव्हलपिंग ग्रोथ स्ट्रॅटेजी फॉर विदर्भा’
घेऊन विदर्भाच्या विकासासाठी आराखडा तयार करणे हा या अभ्यास अहवालाचा प्रमुख उद्देश आहे. जिल्ह्यांच्या विकासाचे धोरण तयार करण्यासाठी याचा उपयोग करण्यात येणार आहे. सद्यस्थितीतील कामकाजाचा आढावा, विकासात्मक व्यूहरचना व नवनिर्मिती दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन असल्याचे तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चांद्रायण यांनी यावेळी सांगितले.

Web Title: nagpur news Developing Growth Strategy for Vidarbha