शाळांमध्ये पंधरा खड्डे खोदून ठेवा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

नागपूर - तीन दिवसांपूर्वी शालेय पोषण आहारासाठी देण्यात आलेली तांदळाची पोती  परत करा अन्यथा पैसे भरा असा अजब आदेश काढल्यानंतर आता वृक्षलागवडीसाठी प्रत्येक शाळांनी १५ खड्डे खोदून ठेवण्याचे निर्देश सर्व शाळांना दिले आहे. याकरिता २१ मेपर्यंत मुदत देण्यात आली असून मुदतीपर्यंत खड्डे न खोदल्यास मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांना कारवाईची करण्याची तंबीसुद्धा देण्यात आली आहे. 

वनविभागामार्फत राज्यातील सर्वच पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद, नगर परिषद, खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांना किमान पंधरा झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या उद्दिष्टानुसार शिक्षण 

विभागाकडून शाळांमध्ये पंधरा खड्डे खोदून ठेवण्याचे लक्ष देण्यात आले. मात्र, साधारणत: पावसाळ्यात वृक्षलागवड होणार असल्याने जवळपास सर्वच शाळांकडून अद्याप खड्डे खोदण्यात आलेले नाही. १६ मे रोजी या संदर्भात उपसंचालक कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ही बाब निदर्शनास आली. त्यावरून उपसंचालक अनिल पारधी यांनी पत्र काढून २१ मे पर्यंत सर्वच शाळांमध्ये पंधरा खड्डे खोदून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. 

विशेष म्हणजे संपूर्ण शाळेत खड्डे खोदून झाल्याचा अहवाल जिल्हा कार्यालयात सादर करावयाचा आहे. हे काम केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनात करायचे असल्याने त्यात कसूर झाल्यास त्यांनाच जबाबदार धरण्यात येणार आहे.

अफलातून निर्देश
शाळांमध्ये पंधरा खड्डे खोदण्यासाठी मजूर लावावे लागणार आहे. मजुरासाठी शासनाकडून कुठलेही अनुदान मिळाले नाही. आतापासून खड्डे खोदून ठेवल्यास ते बुजण्याची शक्‍यता आहे. शिवाय खड्ड्यांचे फोटो केंद्रप्रमुखांना पाठवायचे आहे. केंद्रप्रमुखांकडे जवळपास दहा ते पंधरा शाळांपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे नेमक्‍या कोणत्या शाळेतील खड्डे कोणते हे ओळखणे कठीण होणार आहे. मागील वर्षी शाळांमध्ये लावण्यात आलेले वृक्ष जगलेच नाही. शासनाकडून केवळ अफलातून निर्देश देण्यात येत असल्याचे दिसून येते.

उन्हाळ्याच्या सुटीमध्ये हे काम नेमके कोण करेल, हा प्रश्‍न आहे. मजुरीचा प्रश्‍न असल्याने शासनाने त्यासाठी अनुदानाची तरतूद करावी. तसेच शाळांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. 

-शरद भांडारकर,  सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर सेना.

Web Title: nagpur news Digest fifteen pits in schools