निवासी डॉक्‍टरला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

नागपूर  - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागातील वॉर्ड क्रमांक २२ मध्ये कर्तव्यावर असलेल्या एका महिला निवासी डॉक्‍टरला शनिवारी रात्री साडेआठ वाजता नातेवाइकांनी मारहाण केली. डॉ. चेतना ढवळे असे मारहाण झालेल्या निवासी डॉक्‍टरचे नाव आहे. अजनी पोलिसांत तक्रार करण्यात आली.  

अमरावती येथील आरोग्य विभागाच्या रुग्णालयातून गर्भवती महिलेला जोखमीची प्रसूती म्हणून रेफर करण्यात आले. शनिवारी सायंकाळी महिला मेडिकलमध्ये आली. महिलेस उच्च रक्तदाबासह इतरही समस्या होती. वॉर्डात खाट रिकामी नव्हती. यामुळे एका कोपऱ्यात जागा उपलब्ध करून देण्यात आली.

 कोपऱ्यातील या मातेची प्रकृती गंभीर झाल्यानंतरही दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नातेवाइकांनी केली. तिचे विव्हळणे नातेवाइकांना बघवत नव्हते. महिलेच्या नातेवाइकांनी उपचारासाठी डॉ. चेतना ढवळे यांना विनवणी केली. परंतु या डॉक्‍टराने बघितलेदेखील नाही. महिला नातेवाईक संतप्त झाली. जिवाच्या आकांताने प्रसूतीसाठी भरती असलेली रुग्ण महिला ओरडत होती. डॉक्‍टरशी तू-तू मै-मै केल्यानंतरही बघत नसल्याने दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या डॉ. ढवळे हिला महिला नातेवाइकाने कानशिलात लगावली. डॉक्‍टरला मारहाण झाल्याची वार्ता क्षणात पोहचली आणि निवासी डॉक्‍टर एकवटले. दरम्यान, अजनी पोलिस आणि वरिष्ठ डॉक्‍टर तसेच अधिष्ठाता पोहचल्यामुळे काही प्रमाणात वातावरण निवळले. 

वैद्यकीय अधीक्षक आलेच नाहीत
मेडिकलमध्ये डॉक्‍टरला मारहाण करण्यात आली. अशावेळी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचणे आवश्‍यक आहे. रुग्णालयीन कामकाजाची जबाबदारी वैद्यकीय अधीक्षक यांची आहे. परंतु रात्री दहा वाजल्यानंतरही ते पोहचलेच नाही. २०१६ या सालात वर्षभरात राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्‍टरांना मारहाण झाल्याची सुमारे ४१ प्रकरणे घडली होती. यावर्षी हा आकडा २३ प्रकरणांवर थांबला आहे.

Web Title: nagpur news doctor