माजी कुलगुरू दाणी न्यायालयात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

नागपूर - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांची विदेशी नागरिकत्वाच्या मुद्यावरून कुलपतींनी तडकाफडकी केलेले बडतर्फीचे प्रकरण न्यायालयात पोचले आहे. डॉ. दाणी यांनी कुलपतींच्या निर्णयाला रिट याचिकेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले असून, त्यावर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.

डॉ. दाणी यांना कारकिर्दीत अनेक वादांचा सामना करावा लागला आहे. नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन केंद्रात असताना एका प्रकरणात तक्रार झाल्याने त्यांची थेट हरियानाच्या हिसार येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्रात बदली झाली होती. तेथून त्यांनी कंत्राटी पद्धतीवर अमेरिकेत नोकरी मिळवली होती. 2012 मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आणि त्यांची निवड झाली. त्यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळही वादग्रस्त ठरला. शंभरावर तक्रारी असल्यामुळे कृषिमंत्र्यांनी त्यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिले होते. डॉ. दाणी यांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

Web Title: nagpur news dr. raviprakash dani in court