सावधान....ई-चलान तयार !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

नागपूर - शहरातील चौकाचौकांत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजवरून वाहतूक पोलिसांनी ई-चालान पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी 12 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले विशेष पथक कम करीत आहे. आतापर्यंत हजारो चलानच्या प्रिंट तयार झाल्या असून लवकरच त्या वाहनचालकांच्या हाती पडणार आहेत. 

नागपूर - शहरातील चौकाचौकांत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजवरून वाहतूक पोलिसांनी ई-चालान पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी 12 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले विशेष पथक कम करीत आहे. आतापर्यंत हजारो चलानच्या प्रिंट तयार झाल्या असून लवकरच त्या वाहनचालकांच्या हाती पडणार आहेत. 

शहर पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌ यांनी 17 मे पासून शहरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. महानगरपालिकेच्या सातव्या माळ्यावरील कार्यालयात प्रायोगिक तत्त्वावर "ट्रॅफिक कमांड ऍण्ड कंट्रोल रूम' तयार करण्यात आले. या सुसज्ज कार्यालयात मोठमोठी स्क्रिन्स लावण्यात आली आहे. यामध्ये चौकाचौकांत सुरू असलेल्या सीसीटीव्हीचे दृश्‍य दिसतात. वाहतुकीचे ई-चालान तयार करण्यासाठी पथक तयार करण्यात आले. त्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून सध्या ते शहरातील प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर "वॉच' ठेवत आहेत. 

अनेकांना माहितीच नाही 
स्मार्ट सीटी प्रोजेक्‍टअंतर्गत गेल्या वर्षभरापासून शहरातील चौकात सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू होते. हे काम जवळपास पूर्ण झाल्याची अनेकांना माहिती नाही. त्यामुळे चौकात पोलिस न दिसल्यास अनेक वाहनचालक सिग्नल जम्प करतात, झेब्रा क्रॉसिंगवर उभे राहतात. मात्र, आता सीसीटीव्हीची नजर असल्यामुळे अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. 

शहरातील कायदा व वाहतूक व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सीसीटीव्ही महत्त्वाचे आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था नीट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. 
- डॉ. के. वेंकटेशम्‌, पोलिस आयुक्‍त. 

पोलिस कर्मचारी - 12 
एलसीडी स्क्रिन्स - 25 
चालान - 60,000 
पोस्ट चालान - 9, 000 

Web Title: nagpur news e-challan ready