सकाळ-मधुरांगणतर्फे बुधवारी ‘एक दिवस माहेरचा’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

नागपूर - लग्न होऊन आलेली प्रत्येक सासुरवाशीण नवऱ्याच्या कानात माहेरच्या आठवणी सांगते. मनातील गाठी उकलताना प्रत्येक आठवणीबरोबर तिच्या डोळ्यांत अश्रू असते. येतील दाटून जेव्हा जुन्या आठवणी, उघड्या पडतील जखमा पुन्हा... अन्‌ त्या जखमांवर, गोड फुंकर घालशील का? सांग सखे येशील का? असा वेडावलेला जीव घेऊन माहेरला जाण्याची संधी शोधत असते. ही संधी सकाळ-मधुरांगण आणि कुटे ग्रुप तिरुमला ऑईलतर्फे उपलब्ध करून दिली आहे.

बुधवारी (ता. ३१) मधुरांगणतर्फे ‘एक दिवस माहेरचा’ हा अभिनव कार्यक्रम सीताबर्डी येथील मुंजे चौकातील महाराष्ट्र बॅंकेजवळ फॉर्च्युन मॉल येथील पहिल्या माळ्यावर दुपारी १ ते ५ या वेळात होईल. साऱ्या माहेरवाशिणी या कार्यक्रमात आठवणींना उजाळा देतील. विशेष असे की, कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला गजरा, मेंदी, नेल आर्ट व हळदीकुंकू वाण, फराळ देण्यात येईल. मकरसंक्रात स्पेशल रेसिपी स्पर्धा (कॉन्टेस्ट) घेण्यात येईल.
तिरुमल ऑईलमध्ये गोड आणि तिखट पदार्थ बनवून आणणाऱ्या माहेवाशिणीला विशेष पुरस्कार देण्यात येईल. मकरसंक्रात स्पेशल वेशभूषा स्पर्धाही घेण्यात येईल. आईसोबत आलेल्या लहान मुलांची आईबरोबर सामूहिक लूट करण्याचा कार्यक्रम घेण्यात येईल. याशिवाय म्युझिकल चेअर, एक मिनिट गेम शोसोबत अनेक स्पर्धा घेण्यात येतील. प्रत्येक स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासह अन्य पुरस्कार देण्यात येतील. अधिक माहितीसाठी सकाळ कार्यालय, २७४-१, सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठ या पत्त्यावर किंवा हर्षाली दगडे यांच्याशी ९५२७००४४५६ या मोबाईलवर संपर्क साधावा.

Web Title: nagpur news ek divas moharacha by sakal madhurangan