माजी महापौरांच्या जुगार अड्ड्यावर छापा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

नागपूर - नागपूरचे माजी महापौर पांडुरंग मारोतराव हिवरकर यांचा अजनीत ऑरेंज सिटी क्रीडा व मनोरंजन केंद्र या नावाने ‘हायटेक’ जुगार अड्डा अनेक दिवसांपासून सुरू होता. गुन्हे शाखेने सोमवारी रात्री आठ वाजता छापा घालीत ताशपत्ते व जवळपास एक लाख रुपयांचा  मुद्देमाल जप्त केला. तसेच जुगार खेळणाऱ्या २७ जणांवर गुन्हे दाखल केले.

नागपूर - नागपूरचे माजी महापौर पांडुरंग मारोतराव हिवरकर यांचा अजनीत ऑरेंज सिटी क्रीडा व मनोरंजन केंद्र या नावाने ‘हायटेक’ जुगार अड्डा अनेक दिवसांपासून सुरू होता. गुन्हे शाखेने सोमवारी रात्री आठ वाजता छापा घालीत ताशपत्ते व जवळपास एक लाख रुपयांचा  मुद्देमाल जप्त केला. तसेच जुगार खेळणाऱ्या २७ जणांवर गुन्हे दाखल केले.

पांडुरंग हिवरकर (६७, रा. पार्वतीनगर) यांनी धर्मादाय आयुक्‍त कार्यालयातून क्रीडा व मनोरंजन केंद्राच्या नावावर परवानगी मिळवली होती. त्या केंद्रात ‘हायटेक’ जुगार सुरू केला. जुगाराला अजनी पोलिसांचा आशीर्वाद होता. चोवीस तास सुरू असलेल्या क्रीडा केंद्रात लाखोंची रोज उलाढाल होत होती. नवनियुक्‍त पोलिस उपायुक्‍त नीलेश भरणे यांच्या आदेशानंतरही अजनी परिसरात जुगार अड्ड्याला अजनी पोलिसांनी मूकसंमती दिल्याची माहिती आहे. पोलिस उपायुक्‍त नीलेश भरणे यांच्या परिमंडळातील जुगार अडड्यावर गुन्हे शाखेचे उपायुक्‍त संभाजी कदम यांना छापा घालावा लागल्याने पोलिस वर्तुळात उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे. पान ६ वर 

माजी महापौरांच्या जुगार अड्ड्यावर छापा
किसन वसंतराव प्रधान (रा. कौशल्यानगर), अनिल अशोक काशी (रा. अजनी रेल्वे पोलिस हेडक्वार्टरजवळ, गवई चौक), सचिन रामदास नगरारे (रा. कुकडे ले-आउट), विजय सोमाजी वलके (रा. न्यू कैलासनगर झोपडपट्टी), मनोहर हरिशचंद्र नागदेवे (रा. जयभीमनगर), भीमराज घनश्‍याम कैथवास, विनोद मारोत चहांदे (रा. धारीवाल ले-आउट), किशोर शंकर साठवने (रा. विश्‍वकर्मानगर, गल्ली नंबर ४), मनोज राजेंद्र गुप्ता (रा. स्वागतनगर, हुडकेश्‍वर), शेखर बापूराव चिमूरकर (रा. श्रीरामनगर), अशीष सुरेश राऊत (रा. जयभीमनगर), अमर ताराचंद नंदागवळी  (रा. कौशल्यानगर, कुकडे ले-आउट), पारस आत्माराम कोलते (रा. जयभीमनगर), अतुल  संतोष पेंटा (रा. आदिवासी कॉलनी), राजू देवचंद श्रीवास (रा. बडकस चौक), राजेश ज्ञानेश्‍वर दांडेकर (रा. जुना सक्करदरा), नितीन राजू रंगारी (रा. नवीन बाबूळखेडा), सुधीर दशरथ मेंढे (८५, रा. प्लाट ले-आउट), दिनेश रामदास तोतडे (रा. रघुजीनगर, तारांगण सभागृहजवळ),  सुरेश राजवंशी चव्हाण (रा. बन्सोड ले-आउट, बेलतरोडी), राजेश विजेंदर पालेवार (रा. न्यू बाबूळखेडा घोबी घाट), विजय शालीकराम राठी (रा. रामदासपेठ, लेंडा पार्क), उमेश कैलास सातकर (रा. त्रिशरण चौक) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पैशाऐवजी कॉइनचा वापर
जुगार अड्ड्यात रोख रकमेऐवजी विशिष्ट अशा प्लॅस्टिक कॉइनचा वापर करण्यात येत होता. केंद्राचे व्यवस्थापक सुरेश श्रावण पारशिवनीकर आणि विजय भीमराव वाघमारे यांच्याकडे पैसे जमा करावे लागत होते. त्या बदल्यात तेवढ्याच रकमेचे कॉइन देत होते. कॉइनवर जुगार खेळता येत होता. जिंकल्यानंतर कॉइन परत केल्यास तेवढी रक्‍कम देण्यात येत होती.

Web Title: nagpur news Ex-mayor raid on the gambling spot crime