शेतकऱ्यांनो १५ सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीचे फाॅर्म भरा: जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

त्याकरिता तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी आपल्या क्षेत्रातील संपूर्ण शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्यासाठी सहकार्य करावे त्याचप्रमाणे कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी सुध्दा अर्ज आॅनलाइन भरायचा आहे. सर्व कामे बाजूला ठेवून शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घ्यावे जेणेकरून कोणताही शेतकरी कर्जमाफी योजनेपासुन वंचित राहणार नाही. तसेच ज्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या झाल्या असतील त्या कुटुंबाचे कर्जमाफी अर्ज भरून घ्यावे जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेत सामावून घेतले जाईल.

काटोल : महाराष्ट्र शासनाने एक महत्वाकांक्षी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना अस्तित्वात आणलेली आहे. पूर्वी कर्जमाफी देताना नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळत नव्हता. परंतु यावेळी शासनाने घोषित केलेली कर्जमाफीचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळणार असल्याने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्याकरिता आॅनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबरपर्यंत भरावयाचे असल्याने शेतकऱ्यांनी महा ई सेवा केंद्र, सीएससी सेंटर नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व शासकीय केंद या ठिकाणी जाऊन आपली कुटुंबाची संपुर्ण माहिती आधार नंबरसह अपलोड करावयाची आहे, असे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.

कुर्वे म्हणाले, की त्याकरिता तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी आपल्या क्षेत्रातील संपूर्ण शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्यासाठी सहकार्य करावे त्याचप्रमाणे कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी सुध्दा अर्ज आॅनलाइन भरायचा आहे. सर्व कामे बाजूला ठेवून शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घ्यावे जेणेकरून कोणताही शेतकरी कर्जमाफी योजनेपासुन वंचित राहणार नाही. तसेच ज्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या झाल्या असतील त्या कुटुंबाचे कर्जमाफी अर्ज भरून घ्यावे जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेत सामावून घेतले जाईल.

काटोल फेस्टिव्हलचे औचित्य साधून आमदार डॉ. आशिष देशमुख यांचे पुढाकाराने तालुका क्रिडा संकुल काटोल येथे आज सकाळी ११ वाजता कृषी कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला आमदार डॉ आशिष देशमुख, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, पंचायत समिती सभापती संदीप सराेदे, नगराध्यक्षा वैशाली ठाकुर, जिल्हा परिषद शिक्षण सभापती उकेश चौव्हाण, माजी नगराध्यक्ष व सती अनुसया माता संस्थान पारडसिंगाचे अध्यक्ष चरणसिंग ठाकुर, कृषी मित्र प्रतिष्ठानचे संचालक दिनेश ठाकरे, जिल्हा निबंधक सहकारी संस्था सतिश भोसले, प्रभारी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार प्रसाद मते, नरखेड येथील तहसीलदार जयवंत पाटील, किशोर रेवतकर, दिलीप काळमेघ, सुरेश आरघोडे, मारोतराव बोरकर, पंचायत समिती उपसभापती योगेश चाफले, दिलीप तिजारे, दिनकर राऊत, सोपान हजारे, विजय महाजन, सहाय्यक खंडविकास अधिकारी संजय पाटील व मोठ्या संख्येने सर्व बॅंकांचे अधिकारी व कर्मचारी पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच मोठय़ा संख्येने शेतकरी इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.

यानंतर आमदार डॉ आशिष देशमुख यांनी सांगितले, की या कर्जमाफी योजनेचा लाभ शेवटच्या अगदी तळागाळातील शेतकऱ्यांना मिळावा त्याकरिता सर्व कर्मचारी, मंडळ अधिकारी बॅंक कर्मचारी यांनी प्रत्येक शेतकऱ्याला व्यवस्थित मार्गदर्शन करुन अर्ज भरून घ्यावे. जेणेकरून कोणीही खरा लाभार्थी या कर्जमाफीपासून वंचीत राहता काम नये. प्रास्ताविक जिल्हा निबंधक सतिश भोसले यांनी केले संचालन तहसीलदार प्रसाद मते तर आभार प्रदर्शन पंचायत समिती सभापती संदीप सराेदे यांनी केले.

Web Title: Nagpur news farmer loan waiver in katol