'शहरात येणारा भाजीपाला रोखणार'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

नागपूर - कर्जमाफी, शेतीपूरक अर्थव्यवस्था सुदृढ केली नसल्याने केंद्र शासनाच्या विरोधात एक जूनपासून विदर्भातील शेतकरी संपावर जात आहेत. जय जवान जय किसान  संघटनेने संपाला पाठिंबा जाहीर केला असून, शुक्रवारपासून ग्रामीण भागातून शहरात येणारा भाजपाला रोखण्यात येणार असल्याचा इशारा अध्यक्ष प्रशांत पवार यांनी दिला.

शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के लाभ या प्रमाणात हमीभाव देण्यात यावा, दुधाचे दर ५० रुपयांपर्यंत वाढवावे आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी १ जूनपासून संपावर जाण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाला ४२ संघटनांनी पाठिंबा दिला आहे. शेतकरी संपाच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी शेतकरी संघटना, किसान क्रांती, प्रोग्रेसिव्ह फार्मर्स तसेच शेतकऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या अन्य संघटनांची संयुक्त बैठक आमदार निवासात पार पडली. शेतकऱ्यांचा संपाला विदर्भातूनही पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. नेते किंवा संघटनेने माघार घेतली तरी शेतकरीच मागण्या पूर्ण होईस्तोवर आंदोलन सुरूच  ठेवतील असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. संपकरी शेतकरी केवळ स्वत: पुरते धान्य पिकवतील, ते बाजारात विक्रीसाठी आणणार नाही. उर्वरित जागेत कापूस किंवा तत्सम कॅश क्रॉप शेतकरी घेतील. अन्नधान्याचा पेरा कमी करून बाजारात तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. संपकाळात गावागावांत धरणे, उपोषण करून तहसीलदारांच्या माध्यमातून शासनाला निवेदन पाठविण्यात येणार असल्याचे शेतकरी नेते जियाजीराव सूर्यवंशी आणि राम नेवले यांनी जाहीर केले आहे.

Web Title: nagpur news farmer strike vegetables Jai Jawan Jay Kisan sanghatana