फटाक्‍याने चिमुकल्याचा डोळा निकामी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

नागपूर - दिवाळी हा आनंदोत्सवाचा सण. गोड-धोड खाद्यपदार्थ, नवीन कपडे घालून आप्तस्वकीयांसोबत आनंदोत्सव साजरा करण्याचा सण. फटाके फोडण्याची या सणातली मौज काही वेगळीच असते. मात्र, दुर्लक्षामुळे एका मुलाला डोळा गमवावा लागला. हा चिमुकला गोंदियातील असून त्याच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. यावर्षी ५० पेक्षा अधिक जण फटाक्‍याने भाजले. बारुद गेल्याने चार जणांच्या डोळ्याला इजा झाली. यात एका मुलाने मात्र डोळा गमावला. रस्त्यावर फटाके फोडल्याने अपघात होऊन शेकडोजण जखमी झाल्याचा अंदाज आहे. मात्र यातील ५० जणांवर मेडिकल, मेयोत उपचार झाले.

नागपूरच्या विविध भागांत बुधवारी बेजबादारपणे फटाके फोडल्यामुळे लहान मुलांसह मोठ्यांनाही फटाक्‍यांचा फटका सहन करावा लागला. गुरूवारी सायंकाळी सातनंतर मोकळ्या आकाशात फटाक्‍यांचा धूर दिसत होता. तर, वाहतुकीच्या रस्त्यावर फटाके फोडण्यात येत होते. यामुळे रस्त्यावर वाहने चालवण्यात अडथळा येत होता. तर, भरधाव वाहने रस्त्यावर धावत होते. विविध रस्त्यांवर वाहन चालवताना झालेल्या अपघातामध्ये अनेकजण जण जखमी झाले. यातील मेडिकल आणि मेयोत उपचारासाठी  ५० जणांना आपत्कालीन विभागात दाखल करण्यात होते. याशिवाय आपसी वादविवादातून भांडण झाले. भांडणानंतर झालेल्या मारहाणीतून जखमी झालेल्यांवर उपचार करण्यात आले. अनेक रुग्णांना प्राथमिक उपचारानंतर सुटी दिली. तर, काहींना भरती करण्यात आले. फटाक्‍याने भाजलेल्या रुग्णांसाठी मेयो, मेडिकलमध्ये खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या, हे विशेष. 

सुतळी बॉम्ब ठरला कारणीभूत
एका लहान टिनाच्या डब्याखाली सुतळी बॉम्ब लावला होता. बॉम्ब फुटताच टिनाच्या डबा फुटला. टिनाच्या डब्याचे तुकडे उडाले. हे तुकडे मुलाच्या डोळ्यात शिरले. यात डोळा निकामी झाला आहे. चेहरा विद्रूप दिसू नये म्हणू उपचार सुरू आहेत. विशेष असे की, त्वचा जळाल्याचेही काही रुग्ण असल्याचे नेत्ररोग विभागप्रमुख डॉ. अशोक मदान यांनी सांगितले.

Web Title: nagpur news Fire crackers diwali