कुख्यात गुंडाचा पोलिसावर गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

नागपूर - शांतीनगरात कारने आलेल्या एका कुख्यात गुंडाने पोलिसांवर गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी जिवाची पर्वा न करता सापळा रचून आरोपीला अटक केले. ही थरारक आणि खळबळजनक घटना आज शनिवारी सकाळी साडेदहाला लालगंज राऊत चौकात घडली. या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली. नीतेश देवराव चौधरी (वय २७, रा. तेलीपुरा, पेवठा) असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. 

नागपूर - शांतीनगरात कारने आलेल्या एका कुख्यात गुंडाने पोलिसांवर गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी जिवाची पर्वा न करता सापळा रचून आरोपीला अटक केले. ही थरारक आणि खळबळजनक घटना आज शनिवारी सकाळी साडेदहाला लालगंज राऊत चौकात घडली. या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली. नीतेश देवराव चौधरी (वय २७, रा. तेलीपुरा, पेवठा) असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नगराळे यांच्या माहितीनुसार, नितीश चौधरी याच्यावर तहसील, सीताबर्डी, पाचपावली, प्रतापनगर आणि लकडगंज पोलिस ठाण्यांसह अन्य ठिकाणी १२ ते १५ वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी पिस्तूल बाळगणे, धारदार शस्त्राने हल्ला करणे, तडीपार, स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. नितीश हा कारने आज शनिवारी सकाळी दहाला लालगंज, राऊत चौकातील सुबोध मेडिकोज या दुकानात आला होता. श्रीकांत मुळे यांचे दुकान असून ते दुकानात हजर नव्हते. दुकानात हजर असलेला कर्मचारी प्रेम निमजे याला त्याने ५०० रुपये हप्ता मागितला. त्याने हप्ता देण्यास नकार दिला. त्यामुळे नीतेशने कमरेला खोचलेले पिस्तूल त्याला दाखवले. कर्मचारी घाबरला आणि त्याने मालकाशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात पोलिसांना माहिती मिळताच पोलिस कर्मचारी राजेश ढोंगळे, विजय कडू, युवराज कावळे आणि मनोज सोमकुवर तातडीने घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांना पाहताच नीतेशने पिस्तूल काढून गोळीबार केला. पोलिस कर्मचाऱ्यांनी अचानक झडप घालून त्याला खाली पाडले. दोन्ही हात पकडून पिस्तूल जप्त केली. मानकापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून नीतेशला अटक केली.

खबऱ्याने दिली टिप
नीतेशने मेडिकल स्टोअर्समधील नोकर प्रेमला पिस्तुलाचा धाक दाखवून हप्ता मागितला. दरम्यान, बाजूलाच उभ्या असलेल्या पोलिसांच्या खबऱ्याने लगेच पोलिसांना टिप दिली. तो खबऱ्या स्वतः आरोपीच्या मागेमागे चालत होता. खबऱ्याच्या सतर्कतेमुळे अर्ध्या तासातच कुख्यात गुंडाला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

शिपाई विजयला लागली असती गोळी!
पोलिसांचे पथक सापळा रचून आरोपीवर झडप घालण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांची कुणकूण आरोपीला लागली. त्यामुळे क्षणार्धात कमरेला खोचलेले पिस्तूल बाहेर काढले आणि पोलिसांच्या दिशेने रोखले. त्याने पोलिसांच्या दिशेने गोळी झाडली. ती गोळी थेट पोलिस शिपाई विजयच्या दिशेने येताच चपळाई दाखवून त्‍यांनी गोळी चुकवली. दुसरी गोळी झाडण्याच्या आताच विजयने त्याच्यावर झडप घालून खाली पाडले. 

Web Title: nagpur news Firing on police crime nagpur