नागपूरमध्ये तीन वर्षांत पाच हजार वाहनांची चोरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

तपासाचे प्रमाण केवळ 35 टक्‍के

नागपूर: नागपूर शहरातून पाच हजारांपेक्षा जास्त वाहनांची चोरी झाली आहे. यामध्ये चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा समावेश आहे. चोरी झालेल्या वाहनांच्या तक्रारींच्या निपटाराचे प्रमाण केवळ 35 टक्‍केच आहे. त्यामुळे अनेक जण वाहन चोरी गेल्यानंतर ते परत मिळण्याची आशा सोडून देतात. या प्रकाराकडे पोलिस आयुक्‍तांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

शहर पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌ यांनी बीट सिस्टम आणि अन्य ग्रस्त प्रणालीवर भर देऊन पोलिस विभागात पुरोगामी बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुस्त धोरणामुळे शहरातील घरफोडी, चोरी, चेनस्नॅचिंग, वाहनचोरी, लुटमारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व प्रकारासाठी सदोष ग्रस्तप्रणाली आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा जबाबदार आहे. शहरात दर दिवशी सरासरी दोन वाहने चोरी जातात. गेल्या तीन वर्षात 5 हजार 160 वाहने चोरीला गेल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे.

Web Title: nagpur news five thousand vehicles steal in three years